पिंपरीत पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त; २६ वर्षीय तरुणाला अटक

पिंपरीत पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त; २६ वर्षीय तरुणाला अटक

पिंपरी | १४ ऑक्टोबर २०२६ : पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियमजवळ देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बेकायदेशीररीत्या बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. दीपक भास्कर बर्फे (वय २६ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ५१ हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.५० वाजण्याच्या सुमारास अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील बंद पडलेल्या हॉस्टेलजवळ, नेहरूनगर, पिंपरी येथे करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या मनाई आदेशानुसार १४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत घातक शस्त्रे जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करून आरोपीने आपल्या ताब्यात एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस बेकायदेशीररीत्या बाळगल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ५१ हजार रुपये असल्याचे नोंदवण्यात आले आहे.

या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई ज्ञानेश्वर आनंदराव भुरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा क्रमांक ५३९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

आरोपीविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories