तळेगाव एमआयडीसी | 5 सप्टेंबर 2026 : हायकूल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर केबल आणि अर्थिंग केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना जाधववाडी ता. मावळ परिसरात घडली. चोरी झालेल्या मालाची एकूण किंमत 40 हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
ऋतुराज भरत ढोकणे (वय 27, रा. वराळे फाटा, ता. मावळ ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:30 ते 6 सप्टेंबर रोजी पहाटे 3:50 या कालावधीत घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरला असलेली सुमारे 400 मीटर कॉपर केबल आणि 20 मीटर कॉपर अर्थिंग केबल कापून नेली. मुख्य कॉपर केबलची किंमत 32 हजार रुपये, तर अर्थिंग केबलची किंमत 8 हजार रुपये असल्याचे नोंदीत म्हटले आहे.
याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 264/2026 नोंदवण्यात आला आहे. कंपनी परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे.