मोशी | २९ ऑगस्ट २०२६ : वाकेश्वर मंदिराजवळील मोकळ्या जागेत संशयास्पदरीत्या थांबलेल्या १९ वर्षीय तरुणाकडून अमली पदार्थविरोधी पथकाने ३७ ग्रॅम गांजा जप्त केला. विनापरवाना गांजा बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली असून, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई शुक्रवारी (दि. २८) दुपारी सव्वादोनच्या सुमारास मोशी परिसरात करण्यात आली. याप्रकरणी अमली पदार्थविरोधी पथक क्रमांक तीनमधील पोलीस शिपाई सुंदर मोहन थोरात (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी तुषार गणेश थोरात (वय १९, रा.रिव्हर रेसिडेन्सीजवळ, मोशी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थविरोधी पथक मोशी परिसरात गस्त घालत असताना वाघेश्वर मंदिराजवळील मोकळ्या जागेत आरोपी संशयास्पद स्थितीत आढळला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडे ३७ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत एक हजार पाच रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१५/२०२६ नोंदवण्यात आला आहे. आरोपीविरोधात अमली पदार्थविरोधी कायद्यातील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली असून, हा गांजा त्याने कोठून आणला आणि कोणाला विक्री करणार होता, याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.