केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने ७२ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर, 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने ७२ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर,  'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने ७२ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर,  'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

पिंपरी, ता. २० जुलै २०२६ - केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने ७२ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर केले आहेत. मराठी रंगभूमीवर गाजलेल्या 'मु. पो. बोंबिलवाडी' या नाटकाचे चित्रपटरूप असलेल्या दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' या चित्रपटाने यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार 'आर्टिकल ३७०' ला जाहीर झाला आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीने फीचर आणि नॉन-फीचर या दोन्ही विभागांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 

फीचर फिल्म्स विभागात विवेक फिल्म्स आणि मयसभा करमणूक मंडळी एलएलपी निर्मित ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून निवड करण्यात आली. प्रभावी कथानक, उत्कृष्ट मांडणी आणि संवेदनशील दिग्दर्शनामुळे या चित्रपटाने राष्ट्रीय परीक्षकांची पसंती मिळवली. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण महाराष्ट्रातील विनोदी आणि उपरोधिक कथानक प्रभावीपणे मांडणाऱ्या या चित्रपटाला राष्ट्रीय परीक्षकांनी सर्वोच्च पसंती दिली.

मराठी चित्रपटसृष्टीला संगीत आणि लेखन क्षेत्रातही राष्ट्रीय स्तरावर मोठा गौरव मिळाला. ‘घरत गणपती’ चित्रपटातील ‘नवसाची गौरी माझी’ या गीतासाठी गायक अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. तसेच ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चरित्रपटासाठी योगेश देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट रुपांतरित पटकथा या श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.

अभिनय क्षेत्रातील प्रमुख पुरस्कारांमध्ये ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटासाठी कार्तिक आर्यन आणि ‘ब्रॅमायुगम’ चित्रपटासाठी मामुटी यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेता हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. ‘आर्टिकल  370’ या चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी यामी गौतम यांची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड जाहीर झाली. याच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कारही जाहीर झाला. आदित्य जांभळे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 

याशिवाय, ‘भक्षक’ चित्रपटासाठी संजय मिश्रा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. ‘श्रीकांत’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार जाहीर झाला, तर रणदीप हुड्डा यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण करणारा दिग्दर्शक हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.

नॉन-फीचर विभागातही मराठी चित्रपटांनी आपला ठसा उमटवला. ‘भंगार (Obsolete)’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म हा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला. ‘हमसफर’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुचित्रपट पुरस्कार जाहीर झाला. ‘परत 41° च्या मागावर (On the Trail of 41°)’ या चित्रपटासाठी शिवपाल सिंग कांग यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन पुरस्कार जाहीर झाला. तसेच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी – एकता का प्रतीक’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार जाहीर झाला.

यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपट, कलाकार, लेखक, संगीतकार आणि तंत्रज्ञांनी विविध श्रेणींमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून राष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटसृष्टीची समृद्ध परंपरा, आशयघनता आणि दर्जेदार चित्रनिर्मिती पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories