मतदार याद्यांमधील दुबार नावे हटवण्यासाठी मतदार यादी आधार कार्डशी लिंक करावी - सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार
मतदार याद्यांमधील दुबार नावे हटवण्यासाठी मतदार यादी आधार कार्डशी लिंक करावी - सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार
पिंपरी, ता. ११ - निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि मतदार याद्यांमधील बोगस व दुबार नावांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मतदार यादी आधार कार्डशी लिंक करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांनी प्रशासनाकडे केली आहे. अरुण पवार यांच्या वतीने विधानसभा मतदारसंघ क्र. २०५ चिंचवडचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. कुलकर्णी यांना निवेदन दिले आहे. अरुण पवार यांचे प्रतिनिधी मालोजी भालके व श्रीकृष्ण जाधवर यांनी हे निवेदन दिले.
पवार यांनी निवेदनात म्हटले आहे की, ''मतदार यादी आधार लिंकिंग अनिवार्य केल्यास एका व्यक्तीचे एकाच मतदारसंघात नाव राहील. पर्यायाने दुबार नावांची तत्काळ ओळख पटवून बोगस नोंदणी रोखता येईल. आधार लिंकिंगमुळे कोट्यवधी दुबार नावे कमी होतील. तसेच बोगस मतदानालाही आळा बसेल. दुबार नोंदींची कडक पडताळणी करुन त्या कायमच्या रद्द कराव्यात. दुबार नावे आढळल्यास निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतदाराशी संपर्क साधून केवळ त्याच्या सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणीच नाव कायम ठेवावे.''
पवार यांनी याबाबत सांगितले की, ''पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे. येथील मतदार याद्या आदर्श असाव्यात, यासाठी आमचा लढा सुरु आहे. आधार लिंक केल्यास निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येईल. याबाबत भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्ली, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, महापालिका आयुक्त यांनाही निवेदन दिले आहे.''
- voter verification, bogus voting prevention
- Aadhaar linking, election transparency, voter list correction,
- electoral roll, duplicate voter names,
- विधानसभा मतदारसंघ २०५, निवडणूक निर्णय अधिकारी, श्री. कुलकर्णी,
- सामाजिक कार्यकर्ते, अरुण पवार,
- आधार कार्ड लिंकिंग, निवडणूक पारदर्शकता, मतदार यादी सुधारणा,
- मतदार याद्या, दुबार नावे, बोगस मतदार,