मोशी कचरा डेपो दुर्घटनास्थळी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट

मोशी कचरा डेपो दुर्घटनास्थळी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट

मोशी कचरा डेपो दुर्घटनास्थळी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट

पिंपरी, ता. १० जुलै २०२६ -  मोशी कचरा डेपो दुर्घटनास्थळी आज, शुक्रवारी (ता. १०)  वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्याचे काम वेगाने करण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली. दुर्घटनाग्रस्त कामगारांच्या कुटुबियांशी संवाद साधला. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी अॅड. आंबेडकर यांनी चर्चा केली.

यावेळी, अॅड. आंबेडकर म्हणाले, '' घनकचरा व्यवस्थापन हा महत्त्वाचा विषय दुर्लक्षित आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून दररोज 1400-1500 टन कचरा दररोज जमा होतो. या कचऱ्यातून निघणाऱ्या गॅसचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. लोकवस्ती नसणाऱ्या ठिकाणी महापालिकेने कचरा डेपो तयार केले पाहिजेत.'' 

''बचावकार्य युद्धपातळीवर करायला हवे होते.  कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुरक्षित लवकरात लवकर काढण्यासाठी युद्ध पातळीवर शासनाने प्रयत्न करावे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि शासनाने पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत करावी.  घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार आहोत.'', अशी मागणी अॅड. आंबेडकर यांनी केली.  




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories