अजितदादांची जयंती राज्यभरात साजरी केली जाणार
अजितदादांच्या जयंतीचा शासकीय स्तरावरील अधिकृत व्यक्तींच्या जयंती कार्यक्रमांच्या यादीत समावेश
पिंपरी, ता. १६ जुलै २०२६ - दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचा समावेश शासकीय स्तरावरील अधिकृत थोर व्यक्तींच्या जयंती कार्यक्रमांच्या यादीत करण्यात आला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलै, २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.
परिपत्रकानुसार, स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती २२ जुलै २०२६ (बुधवार) रोजी राज्यभरात साजरी केली जाणार आहे. या दिवशी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाणार आहे. याशिवाय सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्येही जयंती साजरी होणार आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या भागातील सर्व यंत्रणांमध्ये दादांच्या जीवनप्रवासावर आधारित विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अजितदादांनी राज्याचे उपमु्ख्यमंत्री, अर्थमंत्री, जलसंपदामंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. राज्यातील जनतेच्या मनात अजितदादांचे स्थान होते. राज्याच्या प्रगतीसाठी ते अखंडपणे झटत राहिले. आता अजितदादांच्या जयंतीचा शासकीय स्तरावरील अधिकृत राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या जयंती कार्यक्रमांच्या यादीत करण्यात आल्याने त्यांच्या लोकसेवेच्या आठवण कायम सर्वांसोबत राहतील व त्यातून प्रेरणाही मिळणार आहे.
- अधिकृत परिपत्रक, Official Circular
- Ajit Pawar Memories, २२ जुलै जयंती, 22 July Jayanti, राज्यभर जयंती उत्सव, Statewide Celebration, मंत्रालय, Mantralaya, शासकीय कार्यालये, Government Offices, निमशासकीय कार्यालये, Semi Government Offices, शाळा महाविद्यालये, Schools and Colleges,
- सामान्य प्रशासन विभाग, General Administration Department, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, Chief Minister Devendra Fadnavis
- अजितदादा पवार, Ajit Dada Pawar, महाराष्ट्र सरकार, Maharashtra Government, शासकीय जयंती कार्यक्रम, Government Jayanti Program, अधिकृत जयंती यादी, Official Jayanti List,