अजितदादा विमान अपघात चौकशी - राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून विमान कंपनीची सखोल तपासणी सुरु
Mar 05 2026
58
अजितदादा विमान अपघात चौकशी - राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून विमान कंपनीची सखोल तपासणी सुरु
पिंपरी, ता. ५ - महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीत राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) वीएसआर वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या विमान कंपनीची सखोल तपासणी सुरु झाली आहे. 'सीआयडी'ने वीएसआर वेंचर्सला प्रश्नावली पाठवली असून, कंपनीचे मालक रोहित सिंग यांना चौकशीसाठी बोलावले आहे. सीआयडी कार्यालयात चौकशी सुरु आहे.
अपघाताबाबत अजित पवार कुटुंबीयांकडूनही सीआयडीला पत्र देण्यात आले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) २४ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या अहवालात वीएसआर वेंचर्सच्या सुरक्षितता नियमांमध्ये गंभीर चुका आढळल्या होत्या. त्यानंतर कंपनीच्या चार लियरजेट विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. अपघातातील विमान (VT-SSK) हे लियरजेट ४५ मॉडेलचे होते.
अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी नुकतेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात वीएसआर वेंचर्सचे मालक रोहित सिंग उड्डाणादरम्यान पायलट सीटवर झोपलेले दिसत आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जय पवार यांनी रोहित सिंग यांच्या अटकेची आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत कंपनीची सर्व विमानांना ग्राउंड करण्याची मागणी केली आहे.--