आकुर्डी परिसरात रिक्षाचालकाची स्वतःच्या रिक्षामध्ये गळफास घेऊन आत्महत्या

आकुर्डी परिसरात रिक्षाचालकाची स्वतःच्या रिक्षामध्ये गळफास घेऊन आत्महत्या

आकुर्डी परिसरात रिक्षाचालकाची स्वतःच्या रिक्षामध्ये गळफास घेऊन आत्महत्या 

पिंपरी, ता. ११ जुलै २०२६ - आकुर्डी परिसरात ऑटो रिक्षाचालकाने स्वतःच्या रिक्षामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रमोद साळुंखे (वय अंदाजे ३२ वर्षे) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. ते चाकण येथील आंबेठाण परिसरातील रहिवासी आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. ११) सकाळी आकुर्डी परिसरातील सुखवानी हेरिटेज बिल्डिंगसमोर एक रिक्षा संशयास्पद स्थितीत उभारलेली दिसल्यानंतर नागरिकांनी तातडीने निगडी पोलिसांना कळवले. त्या रिक्षामध्ये प्रमोद साळुंखे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना काल मध्यरात्री घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

प्राथमिक तपासात प्रमोद साळुंखे यांनी स्वतःच्या शर्टाचा वापर करून रिक्षाच्या आत गळफास घेतल्याचे समोर आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस उपनिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories