अर्ध्यातासात साडेसातशेहून अधिक पक्षी अचूक ओळखणाचा ८ वर्षीय अर्पित चौधरीचा विक्रम, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

अर्ध्यातासात साडेसातशेहून अधिक पक्षी अचूक ओळखणाचा ८ वर्षीय अर्पित चौधरीचा विक्रम, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

अर्ध्यातासात साडेसातशेहून अधिक पक्षी अचूक ओळखणाचा ८ वर्षीय अर्पित चौधरीचा विक्रम, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

पिंपरी, ता. १५ जुलै २०२६ - निगडी-प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या अर्पित अक्षय चौधरी याने 'Maximum Birds Identified by a Child'या प्रकारात इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रम नोंदवला आहे.

अर्पितने मोठ्या टीव्ही स्क्रीनवर दाखविण्यात आलेल्या भारत आणि जगभरातील ७६३ पक्ष्यांची छायाचित्रे अवघ्या ३१ मिनिटे ४५ सेकंदांत अचूक ओळखून त्यांची नावे सांगत हा विक्रम प्रस्थापित केला. या विक्रमाची अधिकृत नोंद २५ जून २०२६ रोजी करण्यात आली.

अर्पितचा जन्म ५ एप्रिल २०१८ चा आहे. लहानपणापासूनच अर्पितला पक्षीनिरीक्षण, निसर्ग आणि जैवविविधतेची विशेष आवड आहे. सध्या तो भारत आणि जगभरातील १,१०० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती अचूक ओळखू शकतो. यापूर्वी त्याला ३८ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात 'यंग बर्डर अवॉर्ड' देऊन गौरविण्यात आले आहे. तो Bombay Natural History Society (BNHS) चा सदस्य असून विविध पक्षीनिरीक्षण उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतो.

 भविष्यात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवण्याचे त्याचे ध्येय असून त्यासाठी तो सातत्याने तयारी करत आहे. अधिकाधिक शालेय विद्यार्थ्यांमध्ये पक्षीनिरीक्षण, निसर्ग संवर्धन आणि नागरिक विज्ञानाची आवड निर्माण करणे यासाठी अर्पित कार्यरत आहे, असे त्याच्या पालकांनी सांगितले.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories