news
clock
'ज्ञानसागर' प्रदर्शनात ग्रंथ, हस्तलिखिते, संशोधन प्रकल्प पाहण्याची संधी,  भांडारकर संस्थेत सोमवारपर्यंत आयोजन

'ज्ञानसागर' प्रदर्शनात ग्रंथ, हस्तलिखिते, संशोधन प्रकल्प पाहण्याची संधी, भांडारकर संस्थेत सोमवारपर्यंत आयोजन

 'ज्ञानसागर' प्रदर्शनात ग्रंथ, हस्तलिखिते, संशोधन प्रकल्प पाहण्याची संधी,  भांडारकर संस्थेत सोमवारपर्यंत आयोजन 

पिंपरी, ता. २१ - दुर्मिळ हस्तलिखिते, ग्रंथ, संशोधन प्रकल्प आणि मौल्यवान वस्तूंचा असे अनमोल भांडार शहरवासियांना भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत सोमवारपर्यंत (ता. २३) 'ज्ञानसागर' या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले असणार आहे.

या प्रदर्शनाचे उद्घघाटन शनिवारी (ता. २१) झाले. यावेळी महापौर मंजूषा नागपुरे, खेलरत्न पुरस्कार विजेत्या ऑलिंपिकपटू नेमबाज अंजली भागवत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. स्मिता लेले, संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन, विश्वस्त प्रदीप रावत उपस्थित होते.  महाभारत-सांस्कृतिक सूची या संशोधन प्रकल्पातील 'भीम' या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

संशोधनाच्या क्षेत्रात गेली १०८ वर्षे कार्यरत असणाऱ्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेची ३०० हून अधिक प्रकाशने, महाभारत, भागवत, अथर्ववेद, कोरीव लेख, वैज्ञानिक हस्तलिखिते आणि खगोलशास्त्रीय उपकरणे या प्रदर्शनात पाहायला मिळतील. पहिल्याच दिवशी शहरवासियांनी, शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट दिली.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories