भाजप युवा मोर्चाच्या वतीने रुग्णांना व अनाथ मुलांना फळवाटप करुन आमदार शंकर जगताप यांचा वाढदिवस साजरा
Apr 10 2026
47
भाजप युवा मोर्चाच्या वतीने रुग्णांना व अनाथ मुलांना फळवाटप करुन आमदार शंकर जगताप यांचा वाढदिवस साजरा
पिंपरी, ता. १० - आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने चिंचवड येथील तालेरा रुग्णालय आणि पिंपळे गुरव येथील ममता अंध अनाथ कल्याण केंद्र येथे फळांचे वाटप करण्यात आले. फळांची ही छानशी भेट मिळाल्याने अनाथ मुले आनंदून गेली.
अनाथ मुलांच्या सहवासात काही वेळ व्यतीत केल्याने व त्यांना मदत केल्याने मोठे समाधान मिळाले. तसेच रुग्णांची विचारपूस करताना त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून आपले सामाजिक कार्य आणखी जोमाने केले पाहिजे असे वाटले. लोकसेवेचा वसा घेतलेल्या लोकप्रतिनिधीचा वाढदिवस हा सामाजिक बांधिलकी जपून साजरा करणे, हीच त्यांना खरी शुभेच्छा ठरेल, अशा भावना भाजपा युवा मोर्चाच्या सदस्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, महामंत्री मधुकर बच्चे, वरिष्ठ उपाध्यक्ष काळुराम बारणे, नगरसेवक माऊली जगताप, नगरसेवक हर्षल ढोरे, सुरेश भोईर, नगरसेविका मनिषा चिंचवडे, युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे, युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव, नगरसेवक उदय गायकवाड, संकेत चोंधे, संदीप नखाते, सरचिटणीस प्रसाद कस्पटे, राहुल खाडे, दिनेश काटे, सम्यक साबळे, सुमित घाटे, सुधीर साळुंखे, सतीश नागरगोजे, उमेश सांडभोर , विशाल वाघेरे, अजय भोंडवे, गौरव शिरुडे, जालिंदर काटे, दिगंबर गुजर, मंगेश लोहारे, प्रदीप नाईक, अमित देशमुख, सचिन उदागे, अभिजीत बागुल, प्रतीक रामगुडे, यश सांभेराव, साईराज भालेकर, हर्षवर्धन कुंजीर, प्रणव नायर, ओंकार पवार, यश लाखे तसेच सर्व युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.