आषाढी वारीनिमित्त केंब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल प्री-स्कूलमध्ये चिमुकल्यांची पारंपरिक वेशभूषेत बाल दिंडी

आषाढी वारीनिमित्त केंब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल प्री-स्कूलमध्ये चिमुकल्यांची पारंपरिक वेशभूषेत बाल दिंडी

आषाढी वारीनिमित्त केंब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल प्री-स्कूलमध्ये चिमुकल्यांची पारंपरिक वेशभूषेत बाल दिंडी  

पिंपरी, ता. १८ जुलै २०२६ - कृष्णानगर येथील केंब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल प्री-स्कूलमध्ये 'बाल दिंडी व पारंपरिक वेशभूषा' हा सांस्कृतिक उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, वारकरी, छत्रपती शिवाजी महाराज, मावळे अशा पारंपरिक वेशभूषा परिधान करून उपस्थितांची मने जिंकली. दिंडीमध्ये सहभागी होऊन छोटी मुले आनंदून गेली होती. 

यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेतून महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवले. मंदिर परिसरात आयोजित या उपक्रमात पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. मुलांच्या निरागस सादरीकरणाने आणि पारंपरिक पोशाखांनी वातावरण भक्तिमय व आनंदमय झाले.

शाळेच्या कृष्णानगर शाखेच्या प्रमुख किर्ती जाधव व शिक्षकांनी सांगितले की, ''अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये भारतीय संस्कृती, इतिहास, सामाजिक मूल्ये आणि आत्मविश्वास यांची जपणूक होते. शिक्षणासोबतच संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी केंब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल प्री-स्कूल सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करत असते.''

 सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories