मालवाहू गाडी अडवून चालकाला मारहाण; तिघांकडून माल उतरवण्याची धमकी

मालवाहू गाडी अडवून चालकाला मारहाण; तिघांकडून माल उतरवण्याची धमकी

महाळूगे | 31 ऑगस्ट 2026 : कंपनीतून माल भरून मोशीच्या दिशेने निघालेल्या मालवाहू गाडीला तीन अज्ञात व्यक्तींनी अडवले. चालकाला गाडीतून खाली उतरवून मारहाण केली आणि माल भरलेल्या ठिकाणीच खाली करण्याची धमकी दिल्याचा प्रकार मोई मार्गावर घडला.

याबाबत वाहनचालक सूरज गोपाळ तोरे यांनी दक्षिण महालुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटना 29 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास मोई गावच्या हद्दीतील भैरवनाथ मंदिराजवळ घडली. याप्रकरणी 30 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12:05 वाजता गुन्हा नोंदवण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या ताब्यातील सुप्रो मालवाहू गाडी क्रमांक MH 12 WX 4993 घेऊन एका कंपनीतून माल भरून मोशी येथे माल उतरवण्यासाठी जात होते. मोई मार्गावरील भैरवनाथ मंदिराच्या अलीकडे तीन अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवली.

त्यापैकी एका व्यक्तीने फिर्यादीला गाडीतून खाली उतरण्यास सांगितले. कोणतेही कारण नसताना आरोपींनी फिर्यादीला हाताने मारहाण केली. तसेच ज्या ठिकाणाहून माल भरला आहे, त्याच ठिकाणी तो परत उतरवण्याची धमकी दिली. आरोपींनी शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेत आरोपींची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी गुन्हा क्रमांक 697/2026 नोंदवण्यात आला असून दक्षिण महालुंगे एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories