नागरिकांनी गणनाकर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, महापालिकेचे नागरिकांना आवाहन
पिंपरी, ता. ८ - पिंपरी-चिंचवडमध्ये जनगणना २०२७ अंतर्गत पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना प्रक्रिया राबविण्यात येत असून, या प्रक्रियेद्वारे प्रत्येक घराची मूलभूत माहिती संकलित केली जात आहे. नागरिकांनी गणनाकर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महापालिकेने सांगितले आहे की, जनगणनेद्वारे संकलित केली जाणारी माहिती देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अचूक आणि विश्वासार्ह माहिती अत्यंत महत्त्वाची असते. त्या महितीच्या आधारे भविष्यातील विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि नागरिकाभिमुख सेवांचे नियोजन यामुळे अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. आपल्या घरात येणाऱ्या अधिकृत गणनाकर्मचाऱ्यांना योग्य आणि अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा.
महापालिकेचे आवाहन....
* आपली अचूक माहिती द्या.
* गणनाकर्मचाऱ्यांना सहकार्य करा.
* जनगणना यशस्वी करण्यासाठी सहभागी व्हा.