चाकणमध्ये तरुणाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण

चाकणमध्ये तरुणाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण

चाकण | १२ ऑक्टोबर २०२६ : खेड तालुक्यातील निघोजे परिसरात दोन तरुण थांबले असताना तेथे आलेल्या एका व्यक्तीने ३१ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. आरोपीने तरुणाला खाली पाडून छातीवर, पोटावर आणि डाव्या हातावर लाथा मारल्याचा आरोप आहे. या मारहाणीत तरुणाच्या डाव्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधव लक्ष्मण जाधव (वय ३१, रा. नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी योगेश वसंत वेळवंडे (रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ११ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निघोजे येथील गणेश मंदिराच्या पाठीमागील परिसरात घडली.

फिर्यादीनुसार, माधव जाधव आणि आकाश फडके थांबले असताना त्यावेळी आरोपी योगेश वेळवंडे तेथे आला. त्याने माधव यांना उद्देशून येथे दिसायचे नाही, असे सांगत शिवीगाळ केली.

त्यानंतर आरोपीने माधव यांना हाताने मारहाण करून खाली पाडले. त्यांच्या छातीवर, पोटावर आणि डाव्या हातावर लाथा मारल्या. मारहाणीदरम्यान माधव यांच्या हाताला वेदना होऊ लागल्याने त्यांनी ओरडून सांगितले. मात्र, आरोपीने पुन्हा त्यांच्या हातावर लाथ मारल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या मारहाणीत माधव यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत होऊन हाताचे हाड फ्रॅक्चर झाले.

या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८४०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७(२), ११५(२), ३५१(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories