पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात ‘सीएनजी’च्या दरात अडीच रुपयांनी वाढ

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात ‘सीएनजी’च्या दरात अडीच रुपयांनी वाढ

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात ‘सीएनजी’च्या दरात अडीच रुपयांनी वाढ 

पुणे, ता. २८ - महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सीएनजी’च्या दरात प्रतिकिलोमागे २ रुपये ५० पैशांची वाढ केली आहे. हे दर बुधवारी (ता. २७) मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. आता सीएनजीचा नवा दर ९४ रुपये ७५ पैसे प्रतिकिलो झाला आहे. 'एमएनजीएल'ने आपल्या अधिकृत वेबसाईटवर नवीन दर जाहीर केले आहेत. 

आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे, असे  'एमएनजीएल'ने स्पष्ट केले आहे.  ही दरवाढ पुणे महापालिका हद्दीत तसेच फुरसुंगी, पिसोळी, आंबेगाव येथे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत तसेच चाकण, हिंजवडी या परिसरात लागू असणार आहे. या दरवाढीपूर्वी सीएनजीचा दर रुपये ९२.२५ प्रतिकिलो होता. 

घरगुती वापरासाठीच्या पाइप गॅसच्या (PNG) दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. पेट्रोल व डिझेलच्या दरांशी तुलना करता 'सीएनजी'ची दरवाढ झाली असली 'सीएनजी'च्या वापर हा पैशांची बचत करणारा आहे, असे 'एमएनजीएल'ने म्हटले आहे. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories