संत तुकाराम महाराज पालखी सोहळा केंद्रीय आयुध भंडारतर्फे देहूगावात वारकरी व भाविकांना अन्नदान
Jul 08 2026
13
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा केंद्रीय आयुध भंडारतर्फे देहूगावात वारकरी व भाविकांना अन्नदान
पिंपरी, ता. ८ जुलै २०२६ - जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे औचित्य साधून, दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यंदाही केंद्रीय आयुध भंडार (सी.ओ.डी. देहूरोड) डेपो प्रशासनाच्या वतीने देहूगाव येथील हनुमान मंदिर येथे भव्य अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डेपो प्रशासनाकडून दरवर्षी पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांसाठी आणि भाविकांसाठी हा उपक्रम राबवला जातो.
यंदाच्या अन्नदान कार्यक्रमाचा शुभारंभ डेपोचे कमांडंट ब्रिगेडियर विकांत गंभीर साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी मेजर वसंत रंजन, सुरक्षा अधिकारी कॅप्टन सुखविंदर सिंह साहेब, तसेच सी.ओ.डी. डेपोतील वर्क्स कमिटीचे सर्व सदस्य, सर्व जनरल सेक्रेटरी, जे.सी.एम. सदस्य, आणि 'सी.ओ.डी. वर्कर्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड'चे सर्व संचालक व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा सत्कार - अन्नदान समितीच्या वतीने सी.ओ.डी. डेपोचे कमांडंट ब्रिगेडियर विकांत गंभीर साहेब आणि उपस्थित सर्व लष्करी अधिकाऱ्यांचे भावपूर्ण स्वागत व सत्कार करण्यात आला. वर्क्स कमिटीचे व्हाईस चेअरमन श्री. उमाकांत नारायण लिलाकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.वर्क्स कमिटीचे सचिव संजय डुमडे, सांस्कृतिक सदस्य संतोष शितकल, विकास बालघरे, निलेश भेगडे, आकाश पिल्ले यांनी संयोजन केले.
- केंद्रीय आयुध भंडार, Central Ordnance Depot, COD Dehu Road, सीओडी देहूरोड, COD Dehuroad, लष्कर, Indian Army, Defence, संरक्षण विभाग, Defence Department, डेपो प्रशासन, Depot Administration
- Palkhi Sohala 2026, देहूगाव, Dehugaon, देहू, Dehu, वारकरी, Warkari, भाविक, Devotees, अन्नदान, Annadan, Food Donation, महाप्रसाद, Mahaprasad, हनुमान मंदिर, Hanuman Temple
- संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala, आषाढी वारी, Ashadhi Wari, पालखी सोहळा 2026