अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी निषेध काँग्रेसचे उद्या सत्याग्रह आंदोलन

पिंपरी, ता. १० जुलै २०२६ - अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरात झालेल्या संघटित गैरव्यवहार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसच्या वतीने उद्या शनिवारी (ता. ११) अनोखे सत्याग्रह आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी दिली. 

हे आंदोलन एम्पायर इस्टेट पुला खाली, टिपू सुल्ताननगर जवळील हनुमान मंदिरात सकाळी ११ वाजता होणार आहे. यामध्ये, भजन-प्रार्थना केली जाईल.

भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणून भाजप, संघ हे प्रभू श्रीरामाचे अनुयायी नसून ते राम लुटारू आहेत हे दर्शवण्यासाठी सत्याग्रह आयोजित करण्यात आला आहे, असे नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories