क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - ४ जुलै २०२६

क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - ४ जुलै २०२६

 क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - ४ जुलै २०२६

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ कोयता बाळगणाऱ्या तरुणाला थेरगाव परिसरातून अटक 

पिंपरी, ता. ४ जुलै २०२६ - तडीपार आदेशाचे उल्लंघन करून कोयता बाळगून फिरणाऱ्या ३४ वर्षीय तरुणाला काळेवाडी पोलिसांनी थेरगाव येथील धनगरबाबा मंदिरासमोरील रस्त्यावर शुक्रवारी (ता. ३) अटक केली. 

या प्रकरणी पोलिस शिपाई रमेश खेडकर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय राहुल तलवारे (वय २३, रा. मोरया कॉलनी, माऊली चौक, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

पोलिस उपआयुक्त (परिमंडळ-२) यांनी ३० जुलै २०२४ रोजी दिलेल्या आदेशानुसार आरोपीला पिंपरी-चिंचवड, पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तसेच, पोलीस आयुक्तांनी लागू केलेल्या मनाई आदेशानुसार शारिरीक इजा करण्यासाठी वापरात येईल असे  शस्त्र बाळगण्यास बंदी असतानाही आरोपीने लोखंडी कोयता बाळगला होता. आरोपीजवळचा कोयता पोलिसांनी जप्त केला व आरोपीला अटक केली आहे.

आरोपीविरोधात काळेवाडी पोलिस ठाण्यात भारताचा शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३), १३५ व १४२ अन्वये काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिस शिपाई रमेश खेडकर यांनी फिर्याद दिली आहे. असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ भांबोलीत गावठी कट्टा व जिवंत काडतूसासह युवक अटकेत

पिंपरी, ता. ४ जुलै २०२६ - विनापरवाना  २५,०००/- रुपयांचे गावठी पिस्तूल जिवंत काडतूसासह बाळगणाऱ्या २३ वर्षीय युवकाला उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी (ता. २) भांबोली (ता. खेड) येथून अटक केली.  

याबाबत पोलिस शिपाई गणेश राजेंद्र गायकवाड यांनी उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भांबोली (ता. खेड) येथे भामचंद्र डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर कारवाई करण्यात आली. आरोपी कुणाल गणपत जगताप (वय २३, सध्या रा. ता. मावळ) याने विनापरवाना किंमत २५ हजार रुपयांचे एक गावठी पिस्तूल (कट्टा) व ५०० रुपयांच्या जिवंत काडतूसासह बाळगले होते. पोलिसांनी त्याच्याकडील पिस्तूल जप्त करुन त्याला अटक  केली आहे. 

आरोपीविरुद्ध शुक्रवारी (ता. ३) उत्तर म्हाळुंगे पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम, १९५९ च्या कलम ३ (२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ जिवंत काडतूसासह पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला रावेतमधून अटक

पिंपरी, ता. ४ जुलै २०२६ - मनाई आदेशाचा भंग करुन विनापरवाना ५०,०००/- रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत काडतूसासह बाळगणाऱ्या ३१ वर्षीय तरुणाला रावेत पोलिसांनी शुक्रवारी (ता. ३) अटक केली आहे. 

याबाबत, पोलिस शिपाई विनायक सुभाष मराठे (रा. रावेत पोलिस ठाणे) यांनी फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन पांडुरंग घवाळे (वय ३१, रा. रमाबाईनगर, रावेत, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलैला राजयोग कॉलनी रस्त्यावरील कचरा डेपो संरक्षण भिंतीलगत ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी २४ जून ते ७ जुलै २०२६ या कालावधीत लागू केलेल्या शस्त्र बाळगण्यास मनाई आदेशाचे आरोपीने उल्लंघन करुन शस्त्र बाळगल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीला अटक केली. 

आरोपीविरुद्द रावेत पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ मोटारसायकल घसरुन १७ वर्षीय मुलीचा मृत्यू, २१ वर्षीय युवकावर गुन्हा दाखल 

पिंपरी, ता. ४ जुलै २०२६ - मोटारसायकल घसरुन पडल्याने मोटारसायकलवर बसलेल्या तिघांपैकी एका १७ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात 

मोशी येथील बोऱ्हाडेवाडी परिसरात २७ जून २०२६ रोजी रात्री साडेतीनच्या सुमासार झाला होता. या प्रकरणी मोटारसायकल चालवत असलेल्या २१ वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरंजली प्रकाश कराळे (वय १७ वर्षे रा. कुभारगाव ता.पाटण जिल्हा-सातारा) असे मृत मुलीचे नाव आहे. 

याबाबत, मृत मुलीच्या आईने रेणुका प्रकाश कराळे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत यश बाळासाहेब निकम (वय २१ वर्षे रा. चाकण, ता. खेड) हा आरोपी आहे. 

 २७ जून २०२६ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास मयत सरंजली, तिची मैत्रिण व आरोपी यश हे तिघे  बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील संभाजी महाराज पुतळ्यासमोरील रस्त्यावरून पल्सर मोटारसायकलवरुन जात होते. यशने भरधाव वेगाने व वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून दुचाकी चालवल्याने गाडी घसरली. त्यामुळे तिघेही रस्त्यावर पडले. या अपघातात सरंजलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी आरोपीविरोधात भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०६(१), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ व ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला नोटिस बजावण्यात आली आहे. 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ किरकोळ वादातून मित्राने मित्रावरच केला चाकूने हल्ला, चाकणमधील घटना 

पिंपरी, ता. ४ जुलै २०२६ - ''तू किराणा दुकानदाराचे पैस का दिले नाहीत'', असे विचारलेल्या मित्रावरच चाकूने वार करुन त्याला जखमी केल्याची घटना रोहकल रोड (चाकण) येथे ३० जूनला घडली आहे. चाकूने हल्ला करणाऱ्या १८ वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत, हल्ला झालेल्या १९ वर्षीय शिवकुमार महतो याने मित्राविरोधात पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास शिवकुमार याने त्याचा मित्र नरेशकुमार रामप्रकाश महतो (वय १८, सध्या रा. बकरी बाजार, रोहकल रोड, चाकण) याला  किराणा दुकानातून माल घेतल्यानंतर मोबाईल फोन-पे द्वारे पैसे न दिल्याबाबत विचारणा केली. नरेशकुमार याचा मोबाईल किराणा दुकानदाराकडे दिल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या कारणांमुळे आरोपी नरेशकुमार याने भाजी कापण्याच्या चाकूने शिवकुमारच्या डाव्या हाताच्या पोटरीवर तसेच पोटावर वार करून त्याला जखमी केले. पोलिसांनी नरेशकुमारला अटक केली आहे. 

या प्रकरणी आरोपी नरेशकुमार याच्याविरोधात उत्तर चाकण पोलिस ठाण्यातभारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१) व ११५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------  

➡️ कामावरुन काढल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, एकाला अटक

पिंपरी, ता. ४ जुलै २०२६ - कामावरुन काढल्याच्या रागातून एका तरुणाने दुसऱ्या व्यावसायिक तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करुन त्याला जखमी केले. ही घटना २ जुलैला रात्री १० च्या सुमारास भोसरी एमआयडीसी परिसरातील  स्पाईन मॉल चौकात घडली.  हल्ला करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत, हल्ल्याला बळी पडलेला राहुल कुमार श्रीअकलु दास (वय-२८ वर्षे, व्यवसाय रा. निगडी) याने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपीचे नाव महेश दिपक सांगळे (वय २६ वर्षे, रा. दौंड) असे आहे. फिर्यादी राहुलकुमार हा मित्राला भेटण्यासाठी स्पाईन मॉल चौकात आला होते. त्यावेळी ते मोबाईलवर घरच्यांशी बोलत असताना पूर्वी त्याच्याकडे काम करणारा महेश त्याच्याजवळ आला आणि ''मला तुझ्याशी बोलायाचे'', असे राहुलकुमारला म्हणाला. 

तेव्हा राहुलकुमारने ''मला तुझ्याशी काहीही बोलायचे नाही.'', असे महेशला सांगितले आणि राहुलकुमार स्पाईन मॉलमधून खाली येऊन फोनवर बोलत जाऊ लागला. तेव्हा आरोपी महेशने राहुलकुमारवर कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून धारदार शस्त्राने डोक्यात, कानाजवळ व पाठीवर मारले. त्यामुळे राहुलकुमार जखमी झाला. पोलिसांनी आरोपी महेशला अटक केली आहे. 

आरोपीविरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ भोसरीतील ट्रान्सपोर्ट कंपनीची ६५.६८ लाखांची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा

पिंपरी, ता. ४ जुलै २०२६ - खोटया बुकींग ऑर्डर दाखवून दोघांनी इंद्रायणीनगर-भोसरी येथील जी.जी.आर ट्रान्सपोर्टची तब्बल ६५ लाख ६८ हजार ५६५ रुपयांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक डिसेंबर २०२५ पासून ते दिनांक १२ मार्च २०२६ या कालावधीत घडली आहे. 

याबाबत, अनिल हरीभाऊ ढोबळे (वय ३५, रा. गणराज कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत जयंत्रीकुमारी नितेन्द्र प्रसाद (रा. झारखंड) व अनिल अरुण नरळे  (रा. काळेवाडी) हे आरोपी आहेत. डिसेंबर २०२५ पासून ते दिनांक १२ मार्च २०२६ या कालावधीत आरोपींनी संगनमत करुन खोटया बुकींग ऑर्डर दाखवल्या. जी.जी.आर कंपनीचे मालक गगन सिंगविर्दी यांच्याकडून वेळोवेळी अॅडव्हान्स स्वरुपात रक्कम घेऊन जी.जी.आर ट्रान्सपोर्टची एकुण ६५,६८,५६५/- रुपयांची फसवणूक केली. 

आरोपींविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात भारतीयन्याय संहीता कलम ३१६ (४), ३१८ (४), ३३६ (३), ३४० (२), ३ (५) प्रमाणे भारतीय दंड संहिता कलम ४०८, ४२०, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ 'माझ्या पत्नीशी असेलेले प्रेमसंबंध तोड' असे सांगितल्यामुळे पतीवर हल्ला, एकाला अटक

पिंपरी, ता. ४ जुलै २०२६ -  पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन पतीने एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना २ जुलैला अशोकनगर-ताथवडे यथे घडली.  आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.  

याबाबत, पतीने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  अटक आरोपीचे नाव सूरज वैच्या सरदार (वय-२७ वर्षे, रा. अशोकनगर, ताथवडे) असे आहे.

 फिर्यादी तरुणाची पत्नी व आरोपी सूरज यांचे प्रेमसंबंध असल्याचे तक्रारी म्हटले आहे.  आरोपी सूरज व फिर्यादी एकमेकांसमोर आल्यावर फिर्यादी पतीने आरोपी सूरजला  ''तुझे माझ्या पत्नी सोबत असलेले संबंध सोड.'', असे म्हटले. त्याचा राग आल्याने सूरजने त्या पतीवर जिवे ठार मारण्याच्या चाकूने वार केले. 

 'तुला आता जिवंत सोडत नाही'', असे म्हणून त्या पतीच्या हातावर तसेच बरगडीचे मध्यभागी चाकूने वार केले. आरोपी सूरजला पोलिसांनी अटक केली आहे.  आरोपीविरोधात वाकड पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. ३) भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ हातोडीने वार करुन एकाचा खून, आरोपी अटकेत, चऱ्होलीतील घटना 

पिंपरी, ता. ४ जुलै २०२६ -  किरकोळ भांडणाचा राग मनात धरुन एका इसमाचा हातोडीने वार करून खून केल्याची गंभीर चऱ्होली खुर्द परिसरात २ जुलैला घडली. या प्रकरणी २९ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत, ठेकेदार चंद्रकांत पंढरीनाथ भाळे (वय ४३ वर्षे) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपीचे नाव साहील रामदास दाभाडे (वय २९ वर्षे, रा. च-होली खुर्द, ता. खेड) असे आहे.  आरोपीने  किरकोळ भांडणाचा राग मनात धरुन करवीरसींग नथसिंग लोधी (रा. मध्य प्रदेश) यांचे डोक्यामध्ये हातोडीने वार करुन त्यांना ठार मारले. 

 या प्रकरणी आरोपीविरोधात शुक्रवारी (ता. ३) आळंदी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ मोबाईल चोरीच्या संशयावरून ४२ वर्षीय इसमाचा खून, मोईमधील घटना


पिंपरी, ता. ४ जुलै २०२६ -  मोबाईल चोरीच्या संशयावरून मारहाण करुन एका ४२ वर्षीय इसमाचा २९ वर्षीय युवकाने खून केला. ही घटना २९ जून २०२६ रोजी 

 मोई गावच्या हद्दीत (ता. खेड) गुरूकृपा हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली. या प्रकरणी शुक्रवारी (ता. ३) आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत इसमाच्या पत्नीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा, अटक आरोपीचे नाव हरालाल सुभाषचंद्र गौतम (वय २८, व्यवसाय मजुरी, रा. ता. खेड) असे आहे. आरोपीने  फिर्यादीचे पती चाँद याकुब शेख (वय ४२ वर्षे) यांना  मोबाईल घेतल्याच्या संशयावरून चेहऱ्यावरती मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने शेख यांचा मृत्यू झाला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

आरोपीविरोधात दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. ३) भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories