घरगुती सिलिंडर जोडताना गॅस गळती होऊन सिलिंडरचा स्फोट, तरुणाचा मृत्यू, पुण्यातील घटना

घरगुती सिलिंडर जोडताना गॅस गळती होऊन सिलिंडरचा स्फोट, तरुणाचा मृत्यू, पुण्यातील घटना

घरगुती सिलिंडर जोडताना गॅस गळती होऊन सिलिंडरचा स्फोट, तरुणाचा मृत्यू, पुण्यातील घटना  

पुणे, ता. ५ - घरगुती सिलिंडर जोडताना गॅस गळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला... घरात आग लागली आणि घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला. ही भयानक घटना शुक्रवारी (ता. ५) विमाननगरजवळ खांदवेनगर परिसरातील इमारतीतील एका सदनिकेत शुक्रवारी (ता. ५) सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडली आहे. या घटनेत मृत तरुणाचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहे. पत्नी व छोटी मुलगी सुदैवाने बचावल्या आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्या तरुणाचे नाव पांडुरंग विष्णू गित्ते (वय ३५) असे आहे. त्याचे वडील विष्णू मुंजाजी गित्ते (वय ८२) आणि आई वृंदाविनी विष्णू गित्ते (वय ६०) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

खांदवेनगरमध्ये फॉर्च्यून सिटीमध्ये गृहप्रकल्पातील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील हे गित्ते कुटुंब राहते. त्यांच्या स्वयंपाकघरात नवीन सिलिंडर जोडले जात होते.  त्यावेळी सिलिंडरच्या नोझलमधून अचानक गॅस गळती झाली. घरात देवघरात दिवा सुरु होता. त्यामुळे काही मिनिटांत गॅस घरभर पसरला, घरात आग लागली व सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात पांडुरंग गित्ते त्यांचे आई-वडील गंभीर जखमी झाले.  तत्काळ स्थानिक रहिवाशांनी अग्निशामक दलाला घटनेबद्दल कळवले व अग्निशामक दलाच्या खराडी, धानोरी आणि येरवडा केंद्रांतून तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनीआग आटोक्यात आणली. जखमींना रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात दाखल केले.  गंभीर जखमी झाल्याने पांडुरंग गित्ते यांचा मृत्यू झाल्याचे समजले.

घरात आग लागली तेव्हा पांडुरंग गित्ते यांची पत्नी बाथरुममध्ये आंघोळीला गेल्या होत्या व पाच वर्षाची मुलगी गॅलरीत होती. त्यामुळे त्या दोघी वाचल्या. मुलगी किरकोळ भाजली आहे. आगीच्या ज्वाळा पाहून रहिवाशांनी तिला गॅलरीतून उडी मारण्यास सांगितले व तिला व्यवस्थित झेलले. या आगीत गित्ते यांच्या घरातील वायरिंग, फर्निचर, टीव्ही, स्वच्छतागृहाचे दरवाजे, गीझरही व इतर साहित्य जळाले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास खराडी पोलिस करीत आहेत.






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories