श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्तारासाठी फरासखाना आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यांच्या जागेची राज्य सरकारकडे मागणी
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्तारासाठी फरासखाना आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यांच्या जागेची राज्य सरकारकडे मागणी
पिंपरी, ता. ११ ऑगस्ट २०२६ - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्तारासाठी फरासखाना आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यांच्या जागेची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने सध्याची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे मंदिराच्या विस्तारासाठी मास्टर प्लॅन तयार केला जाणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने यांनी मंगळवारी (ता. ११) पत्रकार परिषदेत दिली.
दगडूशेठ गणपती मंदिरात दररोज सुमारे ५० हजार भाविक दर्शनासाठी येतात. सुट्टीच्या दिवशी ही संख्या एक ते दीड लाखांपर्यंत पोहोचते. वाढत्या भाविकसंख्येच्या तुलनेत मंदिर परिसरातील उपलब्ध जागा अपुरी पडत असल्याने विस्ताराची आवश्यकता आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला ‘अ’ दर्जाचा देवस्थानाचा दर्जा मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यालगत शनिवारवाडा, लाल महाल, नाना वाडा आणि भिडे वाडा यांसारख्या ऐतिहासिक वास्तू आहेत. या ठिकाणांचा विचार करून शनिवारवाडा ते सारसबाग परिसराचा एकात्मिक विकास करण्याची गरज आहे. या भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भूमिगत मार्ग उभारण्याचा प्रस्ताव आहे.
फरासखाना आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यांच्या जागेचा वापर करण्याचा प्रस्ताव ट्रस्टने राज्य सरकारकडे पाठविला आहे. फरासखाना आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यांच्या सध्याच्या वास्तू जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे या जागांचा पुनर्विकास करून पोलिस ठाण्यांसाठी पर्यायी व्यवस्था करता येऊ शकते. त्यानंतर संबंधित जागा मंदिराच्या विस्तारीकरणासाठी द्यावी अशी मागणी सरकारकडे केली आहे, असे आमदार रासने यांनी सांगितले.
- Master Plan, Hemant Rasane, हेमंत रासने, भाविक, Devotees, शनिवारवाडा, सारसबाग, Shaniwar Wada, Sarasbaug, भूमिगत मार्ग, Underground Route, एकात्मिक विकास, Integrated Development, देवस्थान अ दर्जा, Maharashtra Government
- Faraskhana Police Station, Vishrambaug Police Station, Pune Temple Development
- Temple Expansion
- Shrimant Dagdusheth Halwai Ganpati
- मास्टर प्लॅन
- फरासखाना पोलिस ठाणे, विश्रामबाग पोलिस ठाणे
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, गणपती मंदिर विस्तार