news
clock
श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टकडून भक्तांसाठी विविध सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार

श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टकडून भक्तांसाठी विविध सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार

श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टकडून भक्तांसाठी विविध सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार 

पिंपरी, ता. ११ - श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या वतीने गणपती मंदिरात येणाऱ्या गणेश भक्तांसाठी एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध कारण्यात येणार आहे. मंदिर परिसरातील नियोजित जागेचे विधिवत भूमिपूजन ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्त यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. राज्यभरातून भाविक दगडूशेठ गपणपतीच्या दर्शनासाठी येत असल्याने दररोजच मंदिरात गर्दी असते. येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून ट्रस्टतर्फे विविध सुविधा निर्माण केल्या जात आहेत.

या विविध सेवांमध्ये स्वछता गृह, मातांसाठी स्तनपान केंद्र, लगेज काउंटर, चपल स्टॅन्ड, सुरक्षा केंद्र, मोबाईल डिपॉझीटी काउंटर, प्रशासकीय कार्यालय, इन्फॉर्मेशन सेंटर, प्रथम उपचार सुविधा असणार आहेत, अशी माहिती ट्रस्टकडून देण्यात आली आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories