news
clock
भारतीय जनता पक्षाच्या मंडल प्रशिक्षण वर्गात कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणीबाबत मार्गदर्शन

भारतीय जनता पक्षाच्या मंडल प्रशिक्षण वर्गात कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणीबाबत मार्गदर्शन

भारतीय जनता पक्षाच्या मंडल प्रशिक्षण वर्गात कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणीबाबत मार्गदर्शन  

पिंपरी, ता. ३१ - भारतीय जनता पक्षातर्फे ‘पंडित दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान - २०२६’ अंतर्गत विशेष मंडल प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडला. या प्रशिक्षणात दिघी-गवळीनगर-गव्हाणेवस्ती आणि धावडेवस्ती-इंद्रायणीनगर-नेहरुनगर या दोन महत्त्वाच्या मंडलांमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

कासारवाडी येथे झालेल्या या प्रशिक्षण वर्गात शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच सक्रिय कार्यकर्ते एकत्र आले  होते. त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण होऊन संघटनात्मक समन्वय अधिक दृढ झाली. सदर प्रशिक्षणात संघटन बांधणी, अंत्योदयाचा विचार आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बूथ स्तरावर पक्षाची उपस्थिती वाढविणे, शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविणे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे यावर प्रशिक्षणात भर देण्यात आला.

 शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ''पक्षाची विचारप्रणाली आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच कार्यकर्त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. या प्रशिक्षणातून मिळणारे ज्ञान कार्यकर्त्यांना जनसेवेत अधिक सक्षम करेल.''

या प्रशिक्षण कार्यक्रमाला आमदार महेशदादा लांडगे, आमदार अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, हेमंतजी हरहरे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, वैशाली खाड्ये, मधुकर बच्चे, महापौर रवी लांडगे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, राजेश पिल्ले, माजी सरचिटणीस राजू दुर्गे, मंडल अध्यक्ष प्रमोद परदेशी, शिवराज लांडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

''मंडल प्रशिक्षण वर्गातून कार्यकर्त्यांना केवळ संघटनात्मक दिशा नाही, तर विचारांची स्पष्टता आणि काम करण्याची नवी ऊर्जा मिळाली. बूथ स्तरापासून नागरिकांपर्यंत पक्षाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध असून, येणाऱ्या काळात अधिक सक्षम आणि समन्वयित पद्धतीने जनसेवा घडताना दिसेल.'' - संजय पटनी, वरिष्ठ उपाध्यक्ष, भाजप

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories