news
clock
देहूरोडमधील तरुणीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील चारही आरोपींना न्यायालयाने ठोठावली दुहेरी जन्मठेप

देहूरोडमधील तरुणीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील चारही आरोपींना न्यायालयाने ठोठावली दुहेरी जन्मठेप

देहूरोडमधील तरुणीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील चारही आरोपींना न्यायालयाने ठोठावली दुहेरी जन्मठेप

पिंपरी, ता. ११ -  सन २०२१ मध्ये देहूरोडमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती व आरोपींनी तरुणीच्या कुटुंबियांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती.  या घटनेतीलील चार आरोपींना न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.   

सन २०२१ मध्ये देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपींनी संगनमताने निर्भयावर जबरदस्ती करुन त्याचे अश्लिल व्हिडीओ तयार करुन ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी निर्भयावर वारंवार जबरदस्तीने सामुहिक बलात्कार केला. सदर गुन्हयातील आरोपींनी निर्भयाला मारहाण करुन तसेच तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देवुन मानसिक व शारीरिक छळ केला होता. आरोपींविरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयातील सर्व आरोपींना अटक करुन दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले होते. सदर गुन्हयाचा खटला पुणे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. 

सदर खटल्यामध्ये वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे याच्यासह साक्षीदारांची साक्ष घेवून भक्कम पुरावे सादर केल्याने न्यायालयाने साक्षी पुराव्यांच्या व युक्तीवादाच्या आधारे आरोपी नोमान ऊर्फ अरबाज जावेद खान, सुलतान ऊर्फ मुश्ताख सलिम सय्यद, रियाज ऊर्फ मन्नन जोवद खान, सोहेल शेरअली पिरझादे यांना दुहेरी जन्मठेप कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories