उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या कामकाजाचा आढावा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या कामकाजाचा आढावा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या कामकाजाचा आढावा

पिंपरी, ता. २६ - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्री क्षेत्र आळंदी येथे भेट देऊन श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यांनी माऊलींच्या चरणी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीचे आणि सर्वांगीण विकासाचे साकडे घातले.

दर्शनानंतर त्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन संस्थानच्या विविध कामकाजाचा आढावा घेतला. यासंदर्भात त्यांना देण्यात आलेल्या निवेदनातील मागण्या आणि विविध विषयांवर शासन स्तरावर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार दिलीप वळसे-पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते, आळंदीचे नगराध्यक्ष प्रशांत कुर्हाडे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त श्री योगी निरंजननाथ आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories