डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील स्मारकावर उद्या सकाळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील स्मारकावर उद्या सकाळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी, ता. १३ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन केले आहे. या विचार प्रबोधन पर्वतील कार्यक्रम पिंपरी येथील भीमसृष्टीच्या शेजारील पटांगणात उभारलेल्या भव्य सभामंडपात होत आहे. उद्या मंगळवारी (ता. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावर (पिंपरी) सकाळी १० वाजता हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. दिवसभर अनेक प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
शहरवासियांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून बाबासाहेबांना वंदन करावे आणि कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
- मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या कार्यक्रमांचे वेळापत्रक असे....
सकाळी ६ वाजता : महामानवांना संगीतमय अभिवादन - संतूर आणि सितार वादनाची जुगलबंदी (सादरकर्त्या- वहाने सिस्टर्स, उज्जैन, मध्यप्रदेश)
सकाळी ८ वाजता : युगपुरुष (गीत गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम, सादरकर्ते – सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक नागसेन सावदेकर आणि कुणाल वराळे )
सकाळी ९ वाजता : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन (हस्ते – महापौर रवि लांडगे, स्थळ – मनपा भवन)
सकाळी ९.१५ वाजता : क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पिंपरी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
सकाळी ९.३० वाजता : वंदना व समता सैनिक दलाची मानवंदना (संयोजन – भारतीय बौद्ध महासभा)
सकाळी ९.३० वाजता : नृत्य कला फ्लॅश मॉब (सादरकर्ते - दिया बनसोडे आणि सहकारी )
सकाळी ९.३० वाजता : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी एच.ए.कॉलनी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
सकाळी ९.४५ वाजता : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दापोडी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
सकाळी १० वाजता : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पिंपरी येथील पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी (आयोजक – एकता कर्मचारी संघटना)
सकाळी १०.३० वाजता : तारपावादक पद्मश्री भिकल्या धिंडा आणि सहकारी यांच्या वतीने महामानवांना आदिवासी कलाविष्कारातून अभिवादन (सादरकर्ते – तारपा आदिवासी नृत्य पथक, वाळवंडा, ता. जव्हार, जि. पालघर)
सकाळी ११ वाजता : सांस्कृतिक शाहिरी जलशाचा कार्यक्रम शाहिरी भीमगर्जना (सादरकर्ते – युवा शाहीर गंधर्व पृथ्वीराज देवानंद माळी सांगलीकर आणि सहकारी)
दुपारी १२.३० वाजता : आंबेडकरी चळवळीतील गायकांचा जीवनपट साकारणारा संगीतमय कार्यक्रम (सादरकर्ते - सुप्रसिद्ध गायक संदेश विठ्ठल उमप, प्रविण डोणे, कडूबाई खरात, अमोल घोडके, ओमकार घाडगे आणि सहकारी)
दुपारी २ वाजता : गीत गायन (सादरकर्ते –चंद्रकांत शिंदे, गायत्री शेलार, राधा खुडे, चित्रसेन भवार)
दुपारी ४ वाजता : प्रबोधनात्मक किर्तनाचा कार्यक्रम (सादरकर्ते - प्रबोधनकार सप्तखंजिरी वादक डॉ. रामपाल धारकर, अमरावती)
सायंकाळी ५.३० वाजता : गीत गायन (सादरकर्ते -अजय देहाडे आणि सारेगमप फेम विनोद गोडबोले)
सायंकाळी ७.३० वाजता : ट्रीब्युट टू महात्मा फुले ऍन्ड डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑन व्हील्स (महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नृत्य संगीतातून अनोखे अभिवादन, सादरकर्ते – राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. सय्यद पाशा आणि भारतातील नामवंत दिव्यांग कलाकार)
रात्री ९.३० वाजता : शौर्यगाथा महामानवांची (लोककलेवर आधारित ४० कलाकारांनी सजलेला पारंपरिक वाद्यवृंदाचा संगीतमय अविष्कार, सादरकर्ते - शेखर नवतरे आणि सहकारी)