news
clock
एम्पायर इस्टेटमधील इमारतींसमोर गतिरोधकांची मागणी, प्रशासन मात्र ढिम्म, रहिवाशांमध्ये नाराजी

एम्पायर इस्टेटमधील इमारतींसमोर गतिरोधकांची मागणी, प्रशासन मात्र ढिम्म, रहिवाशांमध्ये नाराजी

एम्पायर इस्टेटमधील इमारतींसमोर गतिरोधकांची मागणी, प्रशासन मात्र ढिम्म, रहिवाशांमध्ये नाराजी

पिंपरी, ता. ७ - चिंचवड येथील एम्पायर इस्टेट परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांचा धोका लक्षात घेऊन परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी महिनाभरापूर्वी केली होती. मात्र, या महत्वाच्या मागणीवर महापालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. 

एम्पायर इस्टेटसमोरील पुलाच्या उतारावरुन सोसायटीकडे जाणाऱ्या मार्गावर व सोसायटीच्या गेटसमोर गतिरोधक तयार करण्याची गरज आहे. एम्पायर इस्टेटच्या प्रवेशद्वारासमोरुन भरधाव वेगाने वाहने येत-जात असतात. गेटमधून रहिवाशांची तसेच लहान मुलांची सतत ये-जा असते. भरधाव वाहनांमुळे येथे अपघाताची शक्यता ओळखून येथील रहिवाशांनी गतिरोधकाची मागणी केली आहे. प्रशासन मात्र ढिम्म आहे. त्यामुळे, एखादा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का ? असा संपप्त प्रश्न नागरीकांनी विचारला आहे. 

एम्पायर इस्टेटमधील रहिवाशांनी संबंधित अधिकाऱ्यांना अनेकवेळा विनंती केली आहे. 'पुढच्या आठवड्यात काम होईल' असे आश्वासन दिले जात आहे. कार्यवाही कोणतीच होत नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजी व संतापाची भावना आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories