आगीच्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अग्निशामक विभागाकडून नागरीकांना सूचना
पिंपरी, ता. १९ - शहरात अनेकदा रहिवासी इमारती, व्यावसायिक इमारती, दुकाने अशा ठिकाणी आगीच्या घटना घडतात. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महापालिकेच्या अग्निशामक विभागाने नागरीकांना जाहिरातीद्वारे महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
यामध्ये, इमारतीत प्रत्येक मजल्यावर अग्निशामक उपकरण (फायर एस्टिंग्विशर) कार्यरत ठेवा, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याची जागा (फायर एक्झिट) मोकळी ठेवा तसेच फायर अलार्म व स्मोक डिटेक्टर तपासून ठेवा आणि आग लागल्यास घाबरुन न जाता त्वरीत १०१ क्रमांकावर संपर्क साधा, अशा सूचना अग्निशामक विभागाने दिल्या आहे.
याशिवाय, आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरीकांनी काय केले पाहिजे, याबाबत सरकारी कार्यालये, गृहरचना संस्था तसेच शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांना अग्निशामक विभागाकडून प्रशिक्षण दिले जात आहे.
- shops, training, students, teachers, government offices, housing authorities,
- fire exit, citizens, city, residential buildings, commercial buildings,
- fire department, emergency situation, fire alarm, smoke detector, fire extinguisher,
- दुकाने, प्रशिक्षण, विद्यार्थी, शिक्षक, सरकारी कार्यालये, गृहरचना संस्था
- फायर एक्झिट, नागरीक, शहर, रहिवासी इमारती, व्यावसायिक इमारती
- अग्निशामक विभाग, आपत्कालीन परिस्थिती, फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर, फायर एस्टिंग्विशर,