news
clock
राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी रविवारी सातारा जिल्हा संघाची निवड चाचणी

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी रविवारी सातारा जिल्हा संघाची निवड चाचणी

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी रविवारी सातारा जिल्हा संघाची निवड चाचणी

पुणे, ता. ५ - वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरुष खुला गट फुटबॉल स्पर्धेसाठी येत्या रविवारी (ता. ८) निवड चाचणी होणार आहे. या स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे अधिकृत प्रतिनिधित्व करणाऱ्या संघाची निवड करण्यासाठी निवड चाचणी दुपारी ३ वाजता सातारा येथील शानभाग स्कूलच्या मैदानावर होईल.

जिल्ह्याचा बलवान आणि शिस्तबद्ध संघ तयार करण्याच्या उद्देशाने ही चाचणी प्रक्रिया राबविली जात आहे. नितीन भाई भिलारे यांनी जिल्ह्यातील जास्तीतजास्त फुटबॉलप्रेमी खेळाडूंनी या चाचणीला वेळेवर उपस्थित राहून आपले कसब दाखवावे, असे आवाहन केले आहे. 

निवड चाचणीबाबत काही शंका असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास खेळाडूंनी रामनाथ वायफळकर किंवा प्रा. गौरव जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories