संत तुकारामनगरमध्ये ८६ हजारांच्या विदेशी दारुच्या सीलबंद बाटल्या जप्त
पिंपरी, ता. ८ - संत तुकारामनगर पोलिसांनी वल्लभनगर ते नेहरुनगर रोडवर कारवाई करत बेकायदा विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला अटक केली असून, सुमारे १२ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई रविवारी (ता. ७) दुपारी १.४० वाजता महादेव ट्रेडिंग कंपनीसमोर, संत तुकारामनगर परिसरात करण्यात आली. या प्रकरणी पोलिस शिपाई भागवत अंकुश गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी रोहित गोपाळ सुगावे (वय २२, रा. नखाते वस्ती, किनारा कॉलनी, रहाटणी) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून टोयोटा इनोव्हा कारसह एकूण १२,००,००० रुपये किमतीचे वाहन व ८६,२२० रुपये किमतीची विदेशी दारुच्या सीलबंद बाटल्या असा एकूण १२,८६,२२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.