पैलवान गौरव वाघेरे व यशराज अमराळे यांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड
पिंपरी, ता. १६ - पैलवान गौरव वाघेरे व पैलवान यशराज अमराळे यांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघ व संदिपभाऊ वाघेरे युवा मंच यांच्या वतीने महाराष्ट्र केसरी कुस्ती निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली. गौरवची माती विभागातून आणि यशराजची गादी विभागातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने ६८ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब लढत वाघोली येथे दिनांक १८ ते २२ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड शहर कुस्तीगीर संघाची निवड चाचणी स्पर्धा झाली.
गादी विभागातून (८६ ते १२५ किलो महाराष्ट्र केसरी गट) चर्होलीचा पैलवान यशराज अमराळे आणि आकुर्डीचा पैलवान तन्मय काळभोर यांच्यात लढत झाली. यामध्ये यशराजने विजय मिळवून महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब लढती साठी प्रवेश निश्चित केला. तर, माती विभागातून पिंपरीचा पैलवान गौरव वाघेरे आणि भोसरीचा पैलवान समाधान दगडे यांच्यात चुरशीशी लढत झाली. यात गौरवने अधिक गुण मिळवत विजय मिळवून महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब लढतीमध्ये प्रवेश मिळवला.
या स्पर्धेत बालगट व कुमार गट यांच्या देखील निमत्रिंत कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, नगरसेवक संदिप वाघेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघाचे कार्याध्यक्ष विशाल कलाटे, ज्ञानेश्वर कुटे, सचिव संतोष माचुत्रे, दिलीप बालवडकर, भारत केसरी पैलवान विजय गावडे, दिलीप काळे, काळूराम कवितके, पंडित मोकाशी, बबन बोऱ्हाडे, राजू कुदळे, रतन लांडगे, सदाशिव नेवाळे, दिलीप यादव, राजाभाऊ जाधव, सुरेश वाळुंज, विजय पाटुकले, बाबू चिंचवडे, दिगंबर वाघेरे, दिलीप बारणे, राजेश काळभोर, वस्ताद दत्तोबा नाणेकर, नथु शिंदे, सामाजिक कार्यकर्ते शेखर अहिरराव, सचिन गव्हाणे, अनिल रसाळ, सतीश वाघेरे उपस्थित होते.
पंच म्हणून विजय कुटे, रोहिदास आमले, बाळासाहेब काळजे, चंद्रकांत मोहोळ,रूपेश जाधव, निलेश मारणे, तुषार गोळे, अमित म्हस्के, पप्पू कालेकर यांनी काम पाहिले. तर कुस्ती निवेदक हंगेश्वर धायगुडे यांनी केले या निवड चाचणी स्पर्धेमध्ये एकूण १९१ खेळाडूंनी सहभाग घेतला होता तर १८६ लढती झाल्या. स्वागत संदीप कापसे यांनी केले,सूत्रसंचालन अरुण तांबे,तर आभार संदीप वाघेरे यांनी मानले.
स्पर्धेचा निकाल दृष्टीक्षेपात -
(वरिष्ठ गट) - गादी विभागातील सविस्तर निकाल पुढील प्रमाणे :
- ५७ किलो वजन गट – प्रथम – वेदांत जाधव ( भोसरी)
द्वितीय – सुमित कदम (रहाटणी)
- ६१ किलो वजन गट - प्रथम – तुषार पवार(आकुर्डी)
द्वितीय – महेश सलगर (पिंपरी)
- ६५ किलो वजन गट - प्रथम – महेश जाधव( भोसरी)
द्वितीय – अवधुत तांबेकर( रहाटणी)
- ७० किलो वजन गट - प्रथम – योगेश्वर तापकिर (चर्होली)
द्वितीय – कृष्णा काटे (पिंपळे सौदागर)
- ७४ किलो वजन गट - प्रथम – जयेश शेलार (भोसरी)
द्वितीय – सिद्धार्थ आगिवले (पिंपरी)
- ७९ किलो वजन गट - प्रथम – अजिंक्य सांडभोर (चिखली)
द्वितीय – राज बालवडकर (पिंपळे निलख)
- ८६ किलो वजन गट - प्रथम – पृथ्वीराज लांडगे (भोसरी)
द्वितीय – सौरव शिंगाडे (किवळे)
- ९२ किलो वजन गट - प्रथम – पृथ्वीराज नढे (रहाटणी)
द्वितीय – कौस्तुभ जगताप (पिंपळे गुरव)
- ९७ किलो वजन गट - प्रथम – सौरभ जाधव (दिघी)
द्वितीय – पवन चव्हाण (भोसरी)
- ८६ ते १२५ महाराष्ट्र केसरी गट - प्रथम – यशराज अमराळे (चर्होली)
द्वितीय – तन्मय काळभोर (आकुर्डी)
- (वरिष्ठ गट) माती विभागातील सविस्तर निकाल पुढील प्रमाणे -
- ५७ किलो वजन गट - प्रथम – ओम तापकीर(चऱ्होली)
द्वितीय – अजिंक्य माचुत्रे (चिंचवड)
- ६१ किलो वजन गट - प्रथम – प्रतिक धिमधिमे (चर्होली)
द्वितीय – विनायक नाईक(रहाटणी);
- ६५ किलो वजन गट - प्रथम – संकेत माने (आकुर्डी)
द्वितीय – करण खंडाळे (भोसरी)
- ७० किलो वजन गट - प्रथम – प्रणव सस्ते (मोशी)
द्वितीय – स्वराज जाचक (पिंपळे सौदागर)
- ७४ किलो वजन गट - प्रथम – ओमकार हिंगणे (मोशी)
द्वितीय – परशुराम कॅम्प (आकुर्डी)
- ७९ किलो वजन गट - प्रथम – चंद्रभान मदने ( मोशी)
द्वितीय – गणेश साठे (पिंपरी)
- ८६ किलो वजन गट - प्रथम – दिग्विजय काळे (भोसरी)
द्वितीय – अथर्व तांबे (रहाटणी)
- ९२ किलो वजन गट - प्रथम – तेजस फेंगसे (ताथवडे)
द्वितीय – शेखर लोखंडे (पिंपळे गुरव)
- ९७ किलो वजन गट - प्रथम – साहिल नखाते (रहाटणी)
द्वितीय – विश्वजीत कोंडे (पिंपळे निलख)
- ८६ ते १२५ किलोगट महाराष्ट्र केसरी गट
प्रथम – गौरव वाघेरे (पिंपरी)
द्वितीय – समाधान दगडे (भोसरी)
- (बालगट) निमंत्रित - निकाल पुढील प्रमाणे
- २८ किलोगट - प्रथम – सिध्देश रंधवे (थेरगांव)
द्वितीय – रुद्रनिल पिंजण (ताथवडे)
- ३२ किलोगट - प्रथम – वरद जमदाडे (भोसरी)
द्वितीय – वेदांत जाधव (आकुर्डी)
- ३५ किलोगट - प्रथम – आज्ञेश गवळी (भोसरी)
द्वितीय – पंकज हिप्परकर (रहाटणी)
- ४० किलोगट - प्रथम – विराज माने (थेरगांव)
द्वितीय – स्वराज भुजबळ (भोसरी)
- ४५ किलोगट - प्रथम – स्वराज लांडगे (भोसरी)
द्वितीय – हर्षवर्धन मोरे (चिखली)
- (कुमारगट) निमंत्रित
- ४५ किलोगट - प्रथम – ओम नखाते (रहाटणी)
द्वितीय – अनिकेत गाडे (आकुर्डी)
- ५० किलोगट - प्रथम – जय गोडांबे (रहाटणी)
द्वितीय – श्रवण शिंदे (भोसरी)
- ५५ किलोगट - प्रथम – प्रणव लांडगे (भोसरी)
द्वितीय – रतन वाघमारे (रहाटणी)
- ६० किलोगट - प्रथम – रणजित हिप्परकर (रहाटणी)
द्वितीय – आयाज शेख (आकुर्डी)
- ६५ किलोगट - प्रथम – चेतन हिप्परकर (रहाटणी)
द्वितीय – शौर्य खेडकर (रहाटणी)