लाडकी बहिण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांवर कारवाई होणार

लाडकी बहिण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांवर कारवाई होणार

 लाडकी बहिण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांवर कारवाई होणार 

पुणे, ता. १९ - मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. मात्र, काही महिलांनी ई केवायसी केली नाही. त्यांची चौकशी होणार आहे व योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांवरही कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. 

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, ''योजनेतील महिलांना ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र काही महिलांनी ई-केवायसी केली नाही. यासंदर्भात आता तपास केला जणार आहे. प्रत्येक विभागाकडून अशा महिलांची माहिती मागवण्यात आली आहे. त्यांनी केवायसी का केली नाही, याची चौकशी केली जाणार आहे, ज्या अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे. काही पुरुषांनी याचा लाभ घेला आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. '' 

''ई केवायसीनंतर अपात्र ठरलेल्या महिलांचे लाभ बंद करण्यात आले होते. पण, त्यानंतर काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ज्या महिलांच्या नावावर वाहन नसतानाही आरटीओच्या डेटामध्ये नाव आले असेल त्यांनी आवश्यक पुरावे सादर केल्यानंतर पडताळणी करून लाभ पुन्हा देण्यात येणार आहे.'' असे तटकरे यांनी सांगितले. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories