विविध कल्याणकारी योजनांमध्ये बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या लाभ रकमेत वाढ

विविध कल्याणकारी योजनांमध्ये बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या लाभ रकमेत वाढ

विविध कल्याणकारी योजनांमध्ये बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या लाभ रकमेत वाढ 

पिंपरी, ता. १५ जुलै २०२६ - राज्य शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने राज्यातील लाखो नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगारांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे, त्यांच्या सामाजिक सुरक्षेला प्राधान्य देणे आणि त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढीला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे या उद्देशाने मंडळाच्या ४ प्रमुख कल्याणकारी योजनांमध्ये सामाजिक सुरक्षा संहिता २०२० नुसार महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. सुधारित तरतुदींनुसार कामगारांना मिळणाऱ्या लाभ रकमेत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिली.

नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला आधार म्हणून दिली जाणारी एकवेळची आर्थिक मदतीची रक्कम आता ३ लाख ५० हजार रुपये  करण्यात आली आहे. कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाची आर्थिक वाताहत रोखण्यासाठी अपघाती मृत्यू सहाय्य म्हणून एकवेळ तब्बल ६ लाख ५० हजार रुपयांचे भरीव आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. याशिवाय, जर एखाद्या कामगाराला अपघातामुळे किंवा अन्य कारणांमुळे कायमचे अपंगत्व आल्यास एकवेळचे दिव्यांग सहाय्य म्हणून २ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.


 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories