'माझे मैदान, स्वच्छ मैदान' उपक्रमांतर्गत मासुळकर कॉलनीमधील हेडगेवार मैदानाचे होतेय सुशोभीकरण
Mar 07 2026
52
'माझे मैदान, स्वच्छ मैदान' उपक्रमांतर्गत मासुळकर कॉलनीमधील हेडगेवार मैदानाचे होतेय सुशोभीकरण
पिंपरी, ता. ६ - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मासुळकर कॉलनीमधील हेडगेवार मैदानात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 'माझे मैदान, स्वच्छ मैदान' या उपक्रमांतर्गत सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. महापौर रवी लांडगे यांनी मैदानाला प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली.
यावेळी महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाचे स्वच्छ भारत अभियानाचे ब्रेड अॅम्बेसेडर सीए अरविंद भोसले यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. शंकरराव मासुळकर फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल मासुळकर, प्रकल्पाचे व्यवस्थापक आणि अभिनेते रोहित पवार, सहायक आरोग्य अधिकारी तानाजी दाते, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब लांडे, स्थापत्य विभागाचे अनिल जोडे, उद्यान विभागाचे भानुदास तापकीर, क्रीडा विभागाचे अनिल जगताप उपस्थित होते.
गणेश वि परिसरात तेथे पोर्टेब उभारण्याच
हेडगेवार मैदानात गणेश विसर्जन हौद परिसरात साचणारा कचरा लक्षात घेऊन तेथे पोर्टेबल कारंजे उभारण्याचे काम सुरु आहे. महिला खेळाडूंसाठी प्रेरणादायी थीम, पक्ष्यांसाठी विशेष जागा, वृक्षसंवर्धनावर आधारित आकर्षक रंगकाम, सॉफ्ट म्युझिकची व्यवस्था, पाणी व स्वच्छतागृह या सुविधांचे काम सुरु आहे. २५ ते ३० एलईडी दिवे आणि ३० स्प्रिंकलर्स बसविण्यात आले आहेत.
या पाहणीवेळी महापौर लांडगे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील इतर उद्याने व क्रिडांगणांमध्येही असेच प्रकल्प राबविण्याचा मानस व्यक्त केला. अवकारिका समूहानेही यात सहभाग नोंदविला.
या कामामुळे परिसर अधिक स्वच्छ व आकर्षक होण्यास मदत होणार आहे. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.