मोशी येथे गावठी दारु जप्त, महिलेवर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. ६ - भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी परिसरात गावठी हातभट्टी दारु बाळगून विक्री करणाऱ्या एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ३८ हजार ५०० रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे.
रविवारी (ता. ५) दुपारी सुमारे ३.४५ वाजण्याच्या सुमारास शिवरस्ता, रामा ग्रुपच्या शेजारी, लक्ष्मी चौक, मोशी येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आरोपी आपल्या ताब्यात सुमारे ३८,५०० रुपयांची ३८५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु बेकायदेशीररीत्या, विनापरवाना विक्रीसाठी साठवून ठेवत असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी पोलीस शिपाई संदीप प्रकाश गंगावणे (वय ३५), खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.