जनगणनेच्या कामाला जाणाऱ्या शिक्षिकेचा कंटनेरच्या धडकेत जागीच मृत्यू, मावळ तालुक्यातील भीषण अपघात

जनगणनेच्या कामाला जाणाऱ्या शिक्षिकेचा कंटनेरच्या धडकेत जागीच मृत्यू, मावळ तालुक्यातील भीषण अपघात

जनगणनेच्या कामाला जाणाऱ्या शिक्षिकेचा कंटनेरच्या धडकेत जागीच मृत्यू, मावळ तालुक्यातील भीषण अपघात

पिंपरी, ता. २८ - जनगणनेच्या कामासाठी जात असताना एका शिक्षिकेचा कंटनेरची धडक बसून जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (ता. २७) सकाळी साडेदहाच्या सुमारास मावळ तालुक्यातील कान्हे फाटा येथे घडला. दीपाली सुजित तांबे (वय-५० वर्षे, सध्या रा. तानाजीनगर, चिंचवड, मूळ रा. मंचर, खेड) असे  मृत्यू झालेल्या शिक्षेकेचे नाव आहे. जनगणनेच्या कामात दीपाली यांच्याकडे प्रगणकाची जबाबदारी होती. या शिक्षिकेच्या अपघातमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली तांबे या मावळ तालुक्यातील कान्हे जवळील अहिरवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या.  त्या जनगणनेच्या कामासाठी अहिरवडे गावाला त्यांच्या दुचाकीवरुन (एमएच-१४/ सीव्ही-८६१८) चालल्या होत्या. तेव्हा जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर कान्हे फाटा येथील चौकात भरधाव वेगात मागून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या मोटार सायकलला जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दीपाली त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोचले. दीपाली यांच्याजवळील ओळखपत्रामुळे त्यांची ओळख पटली. पोलिसांनी तहसीलदार कार्यालय व दीपाली यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. या घटनेचा पुढील तपास वडगाव पोलिस करीत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories