'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियानातील 'कसं काय?' जनजागृती मोहीमेचे लोकार्पण
पुणे, ता. २१ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत आज मंत्रालय, मुंबई येथे 'कसं काय?' या अधिकृत जनजागृती मोहिमेचे व आरोग्यगीताचे लोकार्पण केले.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणार्या 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' या अभियानाचा भाग असणारी 'कसं काय?' ही जनजागृती मोहीम आहे. ग्रामीण व शहरी भागांतील नागरीकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती बळकट करणे आणि आरोग्यसेवांविषयी नागरिकांमध्ये मागणी व विश्वास निर्माण करणे, आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये लोकांचा सक्रिय सहभाग वाढवणे हे या मोहिमेचे मुख्य उद्देश आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्यविषयक जागृती, मोफत आरोग्य तपासणी आणि समुपदेशन असे उपक्रम राबवले जातात.
'प्रजा निरोगी, तर राज्य सशक्त' या संकल्पनेवर ही मोहीम आधारलेली आहे.याद्वारे आरोग्य गीत आणि प्रचारात्मक पोस्टर्सचे देखील प्रकाशन करण्यात आले.मोहिमेच्या अधिकृत गाण्याचा व्हिडिओ https://www.youtube.com/watch?v=mdKGNchk0aY या लिंकवर पाहता येईल. यावेळी मंत्रिमंडळातील इतर सदस्य तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
- सार्वजनिक आरोग्य विभाग, Public Health Department, ग्रामीण भाग, Rural Areas, शहरी भाग, Urban Areas,
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, Deputy CM Eknath Shinde, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, Deputy CM Sunetra Ajit Pawar,
- आरोग्य जनजागृती, Health Awareness, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, Chief Minister Devendra Fadnavis,
- कसं काय?, Kas Kya, जनजागृती मोहीम, Awareness Campaign,
- माझं गाव आरोग्य संपन्न गाव, My Village Healthy Village,