विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर
पुणे, ता. १८ - केंद्रीय निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीचे मदान १८ जून रोजी आणि मतमोजणी २२ जून रोजी होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय क्षेत्रात घडामोडींना वेग आला आहे.
निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार, २५ मेपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. १ जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. ही निवडणूक सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद, परभणी आणि संभाजीनगर या जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून होणार आहे.
विधानपरिषदेतील आमदारांचा कार्यकाळ संपूनही निवडणूका न झाल्याने काही जागा रिक्त राहिल्या होत्या. आता या निवडणूकीद्वारे रिक्त जागा भरल्या जातील. महाराष्ट्र विधानसभेतील ७८ जागांपैकी २२ सदस्यांची निवड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून केली जाते.
थोडक्यात -
- अधिकृत अधिसूचना जारी होणार २५ मे २०२६ (सोमवार)
- उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०१ जून २०२६ (सोमवार)
- उमेदवारी अर्जाची छाननी ०२ जून २०२६ (मंगळवार)
- अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस ०४ जून २०२६ (गुरुवार)
- मतदान -१८ जून २०२६ (गुरुवार) (सकाळी ८ ते दुपारी ४)
- मतमोजणी - २२ जून २०२६ (सोमवार)
- महाराष्ट्र विधानसभेतील सदस्य, Maharashtra Legislative Assembly members
- मतदान, Voting, मतमोजणी, Vote counting, निवडणूक तारीख, Election schedule, सो
- केंद्रीय निवडणूक आयोग, Election Commission of India, उमेदवारी अर्ज, Nomination filing,
- , Local self-government constituency
- , १७ जागा, 17 seats, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ,
- विधान परिषदेची निवडणूक, Legislative Council election, १