news
clock
५९ हजार ६० रुपयांच्या विदेशी दारुच्या बाटल्या जप्त

५९ हजार ६० रुपयांच्या विदेशी दारुच्या बाटल्या जप्त

५९ हजार ६० रुपयांच्या विदेशी दारुच्या बाटल्या जप्त 

पिंपरी, ता. ४ - थरमॅक्स चौक-आकुर्डी पसिरात ३१ वर्षीय तरुणाकडून पोलिसांनी एकूण ५९ हजार ६०/- किंमतीच्या २७ विदेशी मद्याच्या बाटल्या व एक मोपेड गाडी पोलिसांनी जप्त केले आहे. सोमवारी (ता. ३) रात्री पावणेआठच्या सुमारास थरमॅक्स चौक ते साने चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रोडवर, सुर्या इलेक्ट्रॉनिक्स समोर ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मालक प्रशिल शेट्टी (रा. चिंचवड) यांच्या सांगण्यावरुन आरोपी योगेश गोवर्धन वारे (वय ३१ वर्षे, रा. चिखली) याने एकूण ५९ हजार ६०/- किंमतीच्या २७ विदेशी दारुच्या बाटल्या बेकायदेशीररित्या विक्रीसाठी बाळगल्या होत्या. एक मोपेड गाडीही आरोपीकडून जप्त केली आहे. 

आरोपीविरोधात  महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ नुसार निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories