महाळुंगे | १४ ऑक्टोबर २०२६ : महाळुंगे परिसरात भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ३१ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकीच्या पुढील आणि मागील भागाचे नुकसान झाले असून, अपघातानंतर संबंधित वाहनचालक जखमीला मदत न करता घटनास्थळावरून निघून गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी वंशजीत धोंडीबा परके (वय २९ वर्षे,जि. नांदेड; सध्या राहणार चिरनेर, ता. उरण, जि. रायगड) यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना १२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास महाळुंगे गावाच्या हद्दीतील सिग्मा चौकाजवळ, ससेंरा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसमोरील रस्त्यावर घडली.
फिर्यादींचा भाऊ राहुल धोंडीबा परके (वय ३१ वर्षे, सध्या राहणार कुरुळी, ता. खेड, जि. पुणे) हा पॅशन एक्स प्रो दुचाकी क्रमांक MH 26 A Z 6682 वरून महाळुंगे ते निघोजे या मार्गाने जात होता.
यावेळी समोरून आलेल्या अज्ञात वाहनावरील चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने, हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवत राहुल यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या धडकेत राहुल परके गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचा पुढील आणि मागील भाग तुटून नुकसान झाले.
अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने जखमी राहुल यांना उपचारासाठी नेले नाही. तसेच घटनेची माहिती संबंधित यंत्रणेला न देता तो घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८४५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(२) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४(अ), १३४(ब) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली महाळुंगे | १४ ऑक्टोबर २०२६ : महाळुंगे परिसरात भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ३१ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकीच्या पुढील आणि मागील भागाचे नुकसान झाले असून, अपघातानंतर संबंधित वाहनचालक जखमीला मदत न करता घटनास्थळावरून निघून गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी वंशजीत धोंडीबा परके (वय २९ वर्षे, व्यवसाय नोकरी, राहणार मांजरम, ता. नायगाव (खै), जि. नांदेड; सध्या राहणार चिरनेर, ता. उरण, जि. रायगड) यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना १२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास महाळुंगे गावाच्या हद्दीतील सिग्मा चौकाजवळ, ससेंरा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसमोरील रस्त्यावर घडली.
फिर्यादींचा भाऊ राहुल धोंडीबा परके (वय ३१ वर्षे, सध्या राहणार कुरुळी, ता. खेड, जि. पुणे) हा पॅशन एक्स प्रो दुचाकी क्रमांक MH 26 A Z 6682 वरून महाळुंगे ते निघोजे या मार्गाने जात होता.
यावेळी समोरून आलेल्या अज्ञात वाहनावरील चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने, हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवत राहुल यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या धडकेत राहुल परके गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचा पुढील आणि मागील भाग तुटून नुकसान झाले.
अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने जखमी राहुल यांना उपचारासाठी नेले नाही. तसेच घटनेची माहिती संबंधित यंत्रणेला न देता तो घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८४५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(२) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४(अ), १३४(ब) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अज्ञात वाहन आणि चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस पुढील तपास करीत आहेत.