दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर 

पिंपरी, ता. १४ जुलै २०२६ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. १४) दुपारी एक वाजता ऑनलाइनद्वारे जाहीर करण्यात आला आहे. राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत जुन-जुलैमध्ये ही पुरवणी परीक्षा घेण्यात आली. मंडळाच्या https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

ऑनलाईन निकालानंतर लगेचच १५ जुलै ते २४ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

 विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतः ऑनलाईन अर्ज करावा लागेल. यासाठीचे शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येईल.

ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे आहे, त्यांना प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पुढील ५ कार्यालयीन दिवसांत विहित शुल्क भरून पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल.

जून-जुलै २०२६ च्या पुरवणी परीक्षेत सर्व विषयांसह प्रथमच प्रविष्ट होऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची श्रेणी किंवा गुण सुधारण्यासाठी फेब्रुवारी-मार्च २०२७, जून-जुलै २०२७, फेब्रुवारी-मार्च २०२८ या तीन संधी उपलब्ध असतील. फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी नियमित, पुनर्परीक्षार्थी, खाजगी विद्यार्थी आणि श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील, ज्यांच्या तारखा मंडळातर्फे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील

विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल...

१)  https://www.mahahsscboard.in

२) दहावीचा निकाल पाहण्याची लिंक: https://sscresult.mahahsscboard-result.in/

३) बारावीचा निकाल पाहण्याची लिंक: https://hscresult.mahahsscboard-result.in/


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories