महाराष्ट्र विधान परिषद द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपच्या ११ उमेदवारांची यादी जाहीर
Jun 01 2026
23
महाराष्ट्र विधान परिषद द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपच्या ११ उमेदवारांची यादी जाहीर
पुणे, ता. १ - महाराष्ट्र विधान परिषद द्वैवार्षिक निवडणूक 2026 तसेच नागपूर पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या ११ उमेदवारांची यादी रविवारी (ता. ३१) जाहीर केली आहेत. त्यामध्ये अरुण लखानीजी, अविनाश ब्राह्मणकरजी, प्रविण पोटे पाटील, धैर्यशील कदम, राजेंद्र राऊतजी, प्राजक्त तनपुरे, सुहास शिरसाटजी, अमर राजूरकर, बसवराज पाटीलजी, नंदकिशोर महाजन आणि डॉ. राजीव पोतदारजी यांचा समावेश आहे. उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल या ११ जणांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.
दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्लीत पार पडली. जवळपास दोन तास ही बैठक चालली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बैठकीला उपस्थित होते. बैठकीत विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची चर्चा झाली.