भावाच्या मालमत्तेत नाव लावण्यासाठी बनावट संमतीपत्र; थेरगावमध्ये गुन्हा

भावाच्या मालमत्तेत नाव लावण्यासाठी बनावट संमतीपत्र; थेरगावमध्ये गुन्हा

थेरगाव | 10 सप्टेंबर 2026 : आईकडून मृत्युपत्राद्वारे मिळालेल्या मालमत्तेवर स्वतःचे नाव समाविष्ट करण्यासाठी भावाने बनावट संमतीपत्र तयार करून पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्तेच्या नोंदीत नाव लावून घेतल्याच्या आरोपावरून काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळकृष्ण बंकट टोपे (वय 53, व्यवसाय—Senior Engineer, रा. शकुंतला निवास, भोरडे नगर, थेरगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून राजू बंकट टोपे (वय 57, रा. पवारनगर, दत्तराज कॉलनी, थेरगाव) याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या आईने नोंदणीकृत इच्छापत्र तथा मृत्युपत्रामध्ये संबंधित मालमत्ता फिर्यादीच्या नावावर करण्याची स्पष्ट तरतूद केली होती. आईच्या मृत्यूनंतर मालमत्तेची मालकी फिर्यादीच्या नावावर झाली. महापालिकेच्या मालमत्ता कराशी संबंधित कागदपत्रांमध्येही फिर्यादीचे नाव नोंदवण्यात आले होते आणि त्यांनी नियमितपणे मालमत्ता कर भरला होता.

फिर्यादीच्या वडिलांचा या मालमत्तेच्या मालकीशी संबंध नव्हता. त्यामुळे वडिलांचा वारस म्हणून आरोपीचा संबंधित मालमत्तेवर अधिकार नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या सर्व बाबी माहिती असतानाही आरोपीने मालमत्तेच्या नोंदीमध्ये स्वतःचे नाव लावण्यासाठी कथित बनावट मजकूर आणि संमतीपत्र तयार केले.

संमतीपत्रावर फिर्यादीची बनावट स्वाक्षरी करून ते महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील करसंकलन विभागात सादर करण्यात आल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांची दिशाभूल करून मालमत्ता क्रमांक 1040304734, Survey No. 12/6, भोरडे नगर, थेरगाव या मालमत्तेच्या नोंदीत स्वतःचे नाव समाविष्ट करून घेतल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

ही घटना 29 जून रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 दरम्यान घडली. याप्रकरणी 9 सप्टेंबर रोजी रात्री 10:13 वाजता काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 448/2026 नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories