अॅड. मंगेश मच्छिंद्र नढे यांची पिंपरी-चिंचवड, पुणे उपजिल्हा प्रमुख युवा सेना पदी नियुक्ती
अॅड. मंगेश मच्छिंद्र नढे यांची पिंपरी-चिंचवड, पुणे उपजिल्हा प्रमुख युवा सेना पदी नियुक्ती
पिंपरी, ता. १८ जुलै २०२६ - अॅड. मंगेश मच्छिंद्र नढे यांची पिंपरी चिंचवड, पुणे उपजिल्हा प्रमुख युवा सेना पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे व नगरसेवक विश्वजीत बारणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
अॅड. मंगेश नढे मागील अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून शिवसेना पक्षाकडून मागील महानगर पालिका निवडणुक देखील त्यांनी लढवली आहे व येत्या काळात ज्या शिवसेना पक्षाने आपल्याला निवडणूक लढविण्याची संधी दिली तो पक्ष, संघटना वाढीसाठी चांगले काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला, त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
यावेळी, युवा सेना जिल्हा प्रमुख सागर पाचरणे, आकाश बारणे, अमर नढे, सतीश जारकड, पांडुरंग निकम, रोहित भोसले, धीरज सरोदे उपस्थित होते. उपजिल्हा प्रमुख युवा सेना पदी नियुक्ती झाल्याबद्दल अॅड. नढे यांचे मित्रपरिवाराने हार्दिक अभिनंदन केले आहे.