आपत्ती व्यवस्थापनाच्या वॉर रूमला महापौरांची भेट, जवानांचे व्यक्त केले आभार

आपत्ती व्यवस्थापनाच्या वॉर रूमला महापौरांची भेट, जवानांचे व्यक्त केले आभार

आपत्ती व्यवस्थापनाच्या वॉर रूमला महापौरांची भेट, जवानांचे व्यक्त केले आभार  

पिंपरी, ता. ७ जुलै २०२६ - मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संत तुकारामनगर येथील मुख्य अग्निशामक केंद्र येथे तयार करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन वॉर रूमला महापौर रवी लांडगे यांनी मंगळवारी (ता. ७) भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मदत व पुनर्वसन कार्याची माहिती घेतली.

यावेळी, महापौरांनी अग्निशामक दलाच्या जवानांचे कौतुक करुन आभार मानले. महापौर म्हणाले, ''संकटाच्या काळात रात्रंदिवस निस्वार्थपणे सेवा बजावणारे अग्निशमन दलाचे जवान, अधिकारी आणि सर्व कर्मचारी हे खऱ्या अर्थाने आपल्या शहराचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे सुमारे ५,००० नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात यश आले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी दाखवलेले समर्पण, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठा खरोखरच प्रेरणादायी आहे. अशा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या अथक परिश्रमामुळेच आपत्तीच्या काळात मदतकार्य प्रभावीपणे सुरू ठेवणे शक्य झाले.नागरिकांची सुरक्षितता हेच आमचे सर्वोच्च कर्तव्य असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा २४x७ सज्ज आहे.''




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories