महापौरांनी जाणून घेतला महापालिका शाळेतील 'शून्य कचरा प्रकल्प'
पिंपरी, ता. २० जुलै २०२६ - भोसरी येथील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या इंग्लिश मीडियम शाळेत महापौर रवी लांडगे यांनी भेट देऊन‘शून्य कचरा’उपक्रमाबद्दल जाणून घेतले. विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पर्यावरण संवर्धन, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या सवयी लहानपणापासूनच अंगीकारणे किती महत्त्वाचे आहे, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला. शाळेमध्ये राबवलेल्या शून्य कचरा उपक्रमाची माहिती विद्यार्थी व शिक्षकांनी महापौरांना दिली.
स्वच्छ आणि हरित शहर घडविण्यात प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग महत्त्वाचा आहे. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका विनिता डिसुजा आणि कर्मचारी उपस्थित होते.