केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले इथेनॉलवर चालणाऱ्या शेगडीचे अनावरण
पुणे, ता. २६ - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे इथेनॉलवर चालणाऱ्या नवीन शेगडीचे अनावरण केले आहे. हे तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी आहे आणि भारताच्या जैवइंधन मोहिमेतील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे तंत्रज्ञान एलपीजी सिलिंडरपेक्षा फार स्वस्त आणि पर्यावरणपूरक आहे, असे गडकरी यांनी सांगितले आहे.
या शेगडीचा वापर करणाऱ्या कुटुंबांचा मासिक खर्च एलपीजी गॅसपेक्षा कितीतरी कमी होईल. रॉकेल, लाकूड किंवा कोळशाच्या तुलनेत इथेनॉलचे ज्वलन पूर्णपणे स्वच्छ होते. ही शेगडी इथेनॉल आणि पाण्याच्या मिश्रणावर चालते. शुद्ध इथेनॉल वापरले जात नाही, त्यामुळे सुरक्षितता वाढते आणि स्वच्छ ज्योत मिळते.
भारत एलपीजी आणि कच्च्या तेलाची सुमारे ८५% गरज आयात करतो. इथेनॉलचा वापर वाढल्यास परदेशी चलन खर्चात बचत होईल. उस आणि मका उत्पादक शेतकऱ्यांना नवी बाजारपेठ मिळेल, त्यातून त्यांचे उत्पन्न वाढेल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.
- नवीन तंत्रज्ञान, New Technology, इंधन नवकल्पना, Fuel Innovation
- शेतकरी उत्पन्न, Farmer Income, उस उत्पादक, Sugarcane Farmers, मका उत्पादक, Maize Farmers, इंधन बचत, Fuel Saving,
- MINISTER nitin-gadkari-ethanol-stove-launch
- , एलपीजी, LPG Cylinder, स्वच्छ इंधन, Clean Fuel, नागपूर, Nagpur, इथेनॉल इंधन, Ethanol Fuel, पाणी मिश्रण इंधन, Ethanol Water