चिखली-मोशी परिसरात साकारणार आधुनिक एसटी बस स्थानक, आमदार महेश लांडगे यांची माहिती

चिखली-मोशी परिसरात साकारणार आधुनिक एसटी बस स्थानक, आमदार महेश लांडगे यांची माहिती

चिखली-मोशी परिसरात साकारणार आधुनिक एसटी बस स्थानक, आमदार महेश लांडगे यांची माहिती 

पिंपरी, ता. ३ जुलै २०२६ -  चिखली किंवा मोशी येथे आधुनिक, सुसज्ज एसटी बस स्थानक उभारण्याच्या मागणीची राज्य शासनाने तातडीने दखल घेतली आहे. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला प्रस्तावावर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे. 

 परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांना तातडीने निर्देश देऊन पुणे विभाग नियंत्रकांमार्फत योग्य जागेचे सर्वेक्षण करून नवीन बस स्थानक उभारणीची कार्यवाही जलदगतीने करण्याचे आदेश दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना बस स्थानकासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत.

या बस स्थानकामुळे चिखली, मोशी, चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी, तळवडे, स्पाईन रोड तसेच उत्तर पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिक, विद्यार्थी, कामगार आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आंतरजिल्हा व राज्यांतर्गत प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा होईल.

या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी प्रताप सरनाईक यांचे मनःपूर्वक आभार. हा प्रकल्प लवकरात लवकर प्रत्यक्षात यावा, यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा कायम राहील, असे आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories