मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी प्रकल्प प्रमुख व सुरक्षा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
Jul 14 2026
26
मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी प्रकल्प प्रमुख व सुरक्षा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
प्रकल्पप्रमुख अशोककुमार गुप्ता यांना अटक
पिंपरी, ता. १४ जुलै २०२६ - मोशी कचरा डेपो दुर्घटनेत ९ कामगारांचे प्राण केले आहेत. या प्रकरणी अॅंटोनी लारा या ठेकेदार कंपनी कंपनीचे प्रकल्प प्रमुख अशोककुमार सियाराम शरण गुप्ता (वय -५९ वर्षे, रा. मोशी) व सुरक्षा अधिकारी विजय रामराव सपकाळ (वय ३८ वर्षे, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांच्यावर सोमवारी (ता. १३) एम.आय.डी.सी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकल्प प्रमुख असलेले आरोपी अशोककुमार गुप्ता यांना पोलिसांनी अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीलाही अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.
या दुर्घटनेनंतर महापालिकेचे अधिकारी सोहन मधुकर निकम (वय ५५ वर्षे) यांनी फिर्याद दाखल केली होती. महापालिकेने अॅंटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. या कंपनीला शहरात संकलीत केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कंत्राट दिले आहे. त्या ठिकाणी पावसाळयामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्याला (सॅनिटरी लॅंडफिल्ड) धोका पोहचू नये म्हणून त्या ठिकाणी तपासणी करुन तिथे संभाव्य धोके टाळण्याकरीता आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना करणे ही कंपनीची जबाबदारी होती.
सुरक्षा उपाययोजना न केल्यास जिवीतहानी होईल याची कल्पना असतानाही प्रकल्प प्रमुख अशोककुमार गुप्ता व सेफ्टी अधिकारी विजय सपकाळ यांनी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा काही भाग इमारतीवर व शेजारील रस्त्यावर ढासळला. त्यात एकूण ९ जणांचा मृत्यू झाल्याने आरोपी गुप्ता व सपकाळ यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०५, १२५(ए), १२५(बी), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गणेश जामदार करीत आहेत.
- गुन्हा दाखल, FIR Registered, Criminal Case, अटक, Arrest
- अॅंटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि., Antony Lara Renewable Energy Pvt Ltd, प्रकल्प प्रमुख, Project Head, अशोककुमार सियाराम शरण गुप्ता, Ashokkumar Siyaram Sharan Gupta, विजय रामराव सपकाळ, Vijay Ramrao Sapkal, सुरक्षा अधिकारी, Safety Officer
- सॅनिटरी लँडफिल, Sanitary Landfill, वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प, Waste-to-Energy Project, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, Pimpri Chinchwad Municipal Corporation, PCMC
- मोशी कचरा डेपो दुर्घटना, Moshi Garbage Depot Accident, मोशी दुर्घटना, Moshi Accident, Moshi Landfill Accident